Residents of Shivnagaon in Amravati district gather outside homes after fresh earthquake-like tremors. saamtv
महाराष्ट्र

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

Amravati Earthquake: अमरावतीच्या शिवनागावला भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवले आहेत. तीन महिन्यांत चौथ्या अशी घटना घडलीय. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी भूकंपमापक उपकरणे त्वरित बसवण्याची मागणी केली आहे.

Bharat Jadhav

  • अमरावतीतील शिवनगाव पुन्हा भूकंप सदृश्य धक्क्यांनी हादरले.

  • तीन महिन्यांत चौथ्यांदा धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती.

  • भूकंप मापक यंत्र अद्याप न बसवल्याने ग्रामस्थांची नाराजी.

अमर घटारे, साम प्रतिनिधी

अमरावतीच्या शिवनगाव मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे झटके आले आहे. सकाळी १२.७ मिनिटाने हा झटका आला असून, यापूर्वी बरोबर २४, २५ नोव्हेंबर रोजी हे झटके जाणवले होते. तीन महिन्यात चार वेळा हे भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने गावात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. महिन्याभरापूर्वी जियोलॉजिकल टीम सुद्धा शिवणगाव येथे आली होती. तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेत तपास केला होता.

मात्र कोणतेही ठोस माहिती पुढे आली नाही, त्यानंतर आताही धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने शिवणगाव, शिरजगाव मोझरी येथे मुकंप मापक यंत्र बसवण्यात येणार असल्याचे अश्वासन दिले होते. मात्र अद्याप हे यंत्र बसवण्यात आले नाही, त्यामुळे हे यंत्र तातडीने बसवण्याची मागणी सरपंच धर्मराज खडसे आणि सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी केली आहे.

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर शिवणगावचे सरपंच धर्मराज खडसे, यांनी माध्यांना सांगितलं की, आज ज्याप्रमाणे धक्के जाणवले, तसेच धक्के मागील महिन्यात २४ तारखेला जाणवले होते. तेव्हा दोन-तीनवेळा धक्का जाणवले होते. त्याआधी असे भूकंप सदृश्य झटके जाणवले होते. आज धक्के जाणवल्यानंतर फत्तेपूर येथील घरांमधील भांडे पडली आहेत. त्याची आपण पाहणी केली. गावातील लोकही घरातून बाहेर पडून रस्त्यांवर थांबली होती. धक्के जाणवल्यानंतर शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढलं.

दहा दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.औंढा तालुका भूकंपाने हादरला आहे. या भूकंपाने गावातील लोकांची एकच पळापळ झाली. या घटनेने गावकऱ्यांची एकच भीती पसरली होती. त्याआधी काही दिवसांपूर्वी वसमत तालुक्याला भूकंपाचे धक्के बसले होते. हिंगोलीच्या वसमतमध्ये ३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते.

येथील पांगरा शिंदे आणि परिसराला भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भागात भूगर्भातून अचानक मोठा आवाज आल्यानंतर जमीन हादरली होती. हिंगोलीमधीलऔंढा तालुक्यातील १० गावांना भूकंपाचे धक्के जाणवले. या तालुक्यातील पिंपळदरी गावात नागरिक भीतीने रस्त्यावर धावू लागले. याआधी देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा हादरा बसताच नागरिक घराच्या बाहेर पळू लागले होते. भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं. मात्र प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT