Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : अमरावती जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; मेळघाट परिसरात तीन दिवसांनी येतेय टँकर

Amravati News : पावसाळा कमी झाल्याने धारण, नदी, नाल्यात चांगले पाणी आले नाही. शिवाय जमिनीतील पाण्याचे स्रोत आटल्याने विहिरीतील पाणी साठा देखील कमी झाला आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : यंदा राज्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. (Amravati) अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये देखील भीषण पाणी टंचाई जाणविण्यास सुरवात झाली आहे. या भागातील ८ गावांना ११ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर (Melghat) मेळघाटमधील खडीमल गावात तीन दिवसानंतर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. 

पावसाळा (rain) कमी झाल्याने धरण, नदी, नाल्यात चांगले पाणी आले नाही. शिवाय जमिनीतील पाण्याचे स्रोत आटल्याने विहिरीतील पाणी साठा देखील कमी झाला आहे. यामुळे भीषण पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरची सुविधा करून पाण्याची तहान भागविली जात आहे. यात अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. 

तीन दिवसांनी येतेय  टँकर
मेळघाट मधील खडीमल गावात तीन दिवसा नतर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या दोन वर्षापासून या गावात पाणी टंचाईवर लाखो रुपये खर्च करून देखील अजूनही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. टॅंकरने आणलेले पाणी गावातील विहिरीत सोडले जाते.  त्यानंतर त्या विहिरितून पाणी काढण्यासाठी नागरिकांची विहिरीवर तोबा गर्दी होत आहे.  विहिरीत पाणी सोडल्याने विहिरीतील पाणी गढूळ होत असल्याने नागरिकांना तसेच पाणी प्यावे लागत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT