Amravati: कोंडेश्वर वीटभट्टीवर महसूलची धडक कारवाई, अतिक्रमित झाेपड्याही जमीनदाेस्त; काेट्यावधींच्या नुकसानीचा वीटभट्टी मालकांचा दावा

वीटभट्टी तोडल्याने मेळघाटसह इतर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान वीटभट्टी अतिक्रमण करून बांधल्याने ही कारवाई केली आहे असे तहसीलदार विजय लोखंडे यांनी सांगितले.
bricks manufacturing encroachment removed in amravati
bricks manufacturing encroachment removed in amravatiSaam Digital

- अमर घटारे

अमरावतीच्या लगत असलेल्या कौडेश्वर वीटभट्टीवर आज महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला. महसूल विभागाने वीटभट्टीवर जेसीबी चालवत वीटभट्टी तोडल्या तसेच कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या झोपड्याही पाडून टाकल्या. ही कारवाई चुकीची असून यामध्ये काेट्यावधींचे नुकसान झाल्याचा दावा वीटभट्टी मालक करु लागले आहेत. (Maharashtra News)

कौडेश्वर वीटभट्टीवर आज अचानक महसूल विभागाने कारवाई सुरु केली. यासाठी जेसीबीसह अन्य यंत्रणा आणली हाेती. ही कारवाई करण्यापूर्वी वीटभट्टी मालकांनी आम्हांला कोणत्याही प्रकारची नोटीस दिली गेली नसल्याचे म्हणणे मांडले. परंतु त्यास प्रशासनाने दाद दिली नाही.

bricks manufacturing encroachment removed in amravati
Dhule Crime : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात एलसीबीची माेठी कारवाई, 55 लाखांची रोकड जप्त; तिघांना घेतले ताब्यात

कोंडेश्वर येथील 70 वीटभट्टी आहेत. तेथे शेकडो वीटभट्टी कामगार काम करत असतात. आज झालेल्या कारवाईमुळे वीटभट्टीची नासधूस झाली तसेच वीटभट्टी मालकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान येत्या 20 मे पर्यंत वीटभट्टी खाली करा अशी सूूचना अमरावती महसूल विभागाने वीटभट्टी मालकांना केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

bricks manufacturing encroachment removed in amravati
Ravikant Tupkar: मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा, रविकांत तुपकरांनी निवडणूक आयोगाकडे का केली अशी मागणी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com