बुलढाणा लाेकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे अशी मागणी नुकतीच बुलढाण्यातून लाेकसभा निवडणुक लढविलेले रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून मागणी केली आहे. या पत्रात तुपकर यांनी मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा हा एकमेव पुरावा असल्याचे नमूद केले आहे. (Maharashtra News)
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात मतदान झाले. मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मतदान प्रक्रियेचे झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे असे तुपकर यांचे म्हणणे आहे. तुपकर यांनी त्याबाबतचे निवदेन जिल्हाधिकारी यांनी नुकतेच दिले आहे.
या निवेदनात रविकांत तुपकर यांनी मी स्वतः अपक्ष म्हणून "पाना" या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढविली आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान पार पडले आहे. मतदानाच्या मतदान कक्षामध्ये मतदान निपक्षपातीपणे, मोकळ्या वातावरणात व कायदेशीरपणे पार पडते आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी सर्व मतदान कक्षांमध्ये मतदानाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची सरासरी ५० ते ५५ टक्के पर्यंत होती. अखेरच्या एका तासामध्ये मतदानाच्या टक्केवारी मध्ये आकस्मिकपणे दहा टक्क्यांची वाढ झालेली आहे.
मतदान हे रात्री उशिरापर्यंत चालल्याचे कळते. त्यामुळे सर्व मतदान केंद्रावरील अखेरचे मतदान होऊन मतपेट्या सीलबंद करेपर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. झालेले मतदान हे योग्य प्रकारे झालेले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्व मतदान केंद्रांमध्ये झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे असे तुपकर यांनी पत्रात म्हटले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संबंधित व्हिडिओ रेकॉर्डिंग हे मतदानाची वैधता सिद्ध करणारा एकमेव पुरावा आहे. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेचे करण्यात आलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे, अशी मागणी देखील रविकांततुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.