लोकसभा (dhule) निवडणुकीच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. या दरम्यान (Nandurbar) नंदुरबार लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे शिरपूरमध्ये आले असताना हा प्रकार घडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न आपले सरकार आल्यावर तात्काळ सोडवू; असे आश्वासन दिले होते. मात्र १० वर्षानंतरही फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा निषेधार्थ त्यांचा काळे झेंडे दाखवून शिरपुर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा करवंद नाका येथे आला असता आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला होता. यानंतर पोलिसांनी या निषेधकर्त्यांना तात्काळ बाजूला करत ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.