Ladki Bahin Yojana Latest Marathi News Saam TV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची आर्थिक लूट; तलाठी पैसे घेतानाचा VIDEO व्हायरल

Viral Video of Talathi taking money for Chief Minister Majhi Ladaki Bahine Yojana: लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा करत महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा मोठा गाजावाजाही झाला. पण प्रत्यक्षात योजनेचे अर्ज भरताना महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. तलाठी कार्यालयातील कर्मचारी अर्जासाठी महिलांकडून पैसे उकळत असल्याचं समोर आलं आहे.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या (Amravati News) वरूड तालुक्यातील सावंगी गावात हा प्रकार घडलाय. गावातील तलाठी तुळशीराम कठाळे आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी हे अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांकडून ५० रुपये घेत आहेत, असा आरोप गावकऱ्यांनी केलाय.

दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील (jalgaon News) जामोद तालुक्यातल्या खेर्डा बुद्रुक येथील तलाठ्याने महिलांसोबत हुज्जत घालत अर्ज स्वीकारणे बंद केल्याचा प्रकार घडला आहे. माझी कुठेही तक्रार करा, मी तुमचे अर्ज घेणार नाही, असं म्हणत हा तलाठी थेट कार्यालय बंद करून निघून जाताना दिसून येतोय.

दोन्ही तलाठ्यांचे प्रकार समोर आल्याने प्रशासन नेमकं त्यांच्यावर काय कारवाई करतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, लाडली बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी गावागावातील महिला तलाठी कार्यालयात गर्दी करत आहेत. यामुळे तलाठ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय, प्रशासनाने यावर काही उपाय काढावा अशी मागणी तलाठ्यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलैपासून महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि होतकरू महिलांना प्रतिमहिना १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. ही योजना राबविण्यासाठी सरकारवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. अर्ज भरण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबुक आणि दोन पासपोर्ट फोटो असणे गरजेचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT