Ravi Rana Criticized On Maha Vikas Agahdi Saam Tv
महाराष्ट्र

Ravi Rana: नवनीत राणा यांना सुपारी घेऊन पाडलं, आज अमरावतीचा विकास थांबलाय; आमदार रवी राणा संतापले

Ravi Rana Criticized On Maha Vikas Agahdi : लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता.

Priya More

'नवनीत राणा यांना सुपारी घेऊन पाडलं. मविआने खोटा नरेटिव्ह सेट केला.' असा आरोप आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balavant Wankhede) यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता. यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी थेट बच्चू कडू आणि महाविकास आघाडीवर अनेक आरोप केले आहेत.

रवी राणा यांनी सांगितले की, 'नवनीत राणा यांना सुपारी घेऊन पाडलं. मविआने खोटा नरेटिव्ह सेट केला. संविधान कोणाचा बाप बदलू शकत नाही. खोट बोलून प्रचार करुन मत मिळवली. येणाऱ्या काळात माझा पक्ष देखील मैदानात असेल. या पराभवाची मी जबाबदारी घेतली आहे. ज्यांनी राजकीय रोट्या शेकल्या. आज अमरावतीचा विकास थांबला हे प्रत्येक मतदाराला माहित आहे. सुपारीबाजांना जनता धडा शिकवणार आहे. आगामी निवडणुकीत ताकदीने लढू.' असे म्हणत रवी राणा यांनी नाव न घेता बच्चू कडू यांना इशारा दिला.

अमरावतीच्या विमानतळाच्या लोकार्पनासाठी नवनीत राणा आणि रवी राणा दिल्लीमध्ये आहे. यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केंद्रीय उड्डान मंत्र्यांची भेट घेतली. १५ ऑगस्टला अमरावती विमानतळावरून विमानाची अवागमान सुरू करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केंद्रीय उड्डाणमंत्री किजरापू राम मोहन नायडू यांच्याकडे मागणी केली. तसेच अमरावती विमानतळावरील मंजूर आशिया खंडातील पायलट ट्रेनिंग सेंटर देखील याच सत्रात सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

अमरावती विमानतळ सुरू होण्याच्या मुद्द्यावर विद्यमान खासदार बळवंत वानखडे आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यात श्रेयवाद रंगण्याची शक्यता आहे. अमरावती विमानतळ ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपासून खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती विमानतळच्या विकास कामाची पाहणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT