Maha vikas aghadi : महाविकास आघाडीचा ४ जागांचा तिढा कायम, बैठक पुन्हा ठरली निष्फळ

Maha vikas aghadi Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बुधवारी देखील या जागांवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. मात्र, मविआ नेत्यांची कालची बैठक देखील निष्फळ ठरण्याची माहिती समोर आली आहे.
Maha Vikas Aghadi Seat Allocation
Maha Vikas Aghadi Seat Allocation Saam Digital
Published On

रुपाली बडवे, मुंबई

Maha vikas aghadi Seat Sharing :

ऐन लोकसभा निवडणुकीत महायुतीसहित महाविकास आघाडीच्या जागावाटपांचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीने ४ जागांवर तोडगा काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचे नेते ४ जागांवर तोडगा काढण्यासाठी तासंतास बैठका घेत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बुधवारी देखील या जागांवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. मात्र, मविआ नेत्यांची कालची बैठक देखील निष्फळ ठरण्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार या प्रमुख पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. या पक्षाने काही जागांवर उमेदवारही जाहीर केले आहेत. तसेच पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ४ जागांवर तिढा कायम असल्याचे चित्र आहे.

Maha Vikas Aghadi Seat Allocation
Unmesh Patil News: उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का; खासदार उन्मेष पाटलांनी बांधले शिवबंधन

राज्यातील ४ जागांवरील तिढा मिटविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल बुधवारी सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या जागांमध्ये सांगली, भिवंडी, सातारा आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या चारही जागांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कालची बैठकही निष्फळ ठरल्याची माहिती हाती आली आहे.

ठाकरे गट हा सांगली आणि दक्षिण मध्य-मुंबई या जागेवरून माघार न घेण्यावर ठाम असल्याची माहिती समजत आहे. तर भिवंडी आणि सातारा या जागेसाठी शरद पवार गटाची आग्रही भूमिका कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. या पूर्वी देखील शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या घरी झालेली ६ तासांची बैठक निष्फळ ठरली होती.

Maha Vikas Aghadi Seat Allocation
Uddhav thackeray : आपलं ध्येय एक, आपला झेंडा भगवा; उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, बुधवारी ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या जागेवरही भाष्य केलं. ' उत्तर मुंबई मित्रपक्षाने लढावी अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडे उमेदवार आहे. पण मुंबईच्या दोन जागा मित्रपक्षाने लढायला हव्यात, असं भाष्य उद्धव ठाकरेंनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com