Uddhav thackeray : आपलं ध्येय एक, आपला झेंडा भगवा; उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav thackeray Speech :
जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत ठाकरे गटात प्रवेश केला. ते गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर उन्मेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी उन्मेश पाटील यांचं पक्षात स्वागत केलं. 'आपलं ध्येय एक असून झेंडा भगवा आहे. आपला शिवसेनेचा झेंडा जळगावमध्ये फडकला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर म्हटलं.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाील मुद्दे
>> उन्मेश पाटील आणि सहकाऱ्यांचे स्वागत करतो. तुमच्या आणि आमच्या भावना सारख्याच आहे.
>> तुम्ही भाजप वाढवली, त्याप्रमाणे शिवसैनिकांनीही भाजप वाढविण्यासाठी मेहनत घेतली. मात्र, भाजपची लोकांना वापरा आणि फेका अशी नीती आहे.
>> आता घाबरू नका, भाजपची अवस्था खराब होणार आहे.
>> माझ्याकडे आता काही नाही. तुम्ही सत्ता आणण्यासाठी शिवसेनेसोबत आलात.
>> तुमची फसगत झाली, त्यांना पुन्हा निवडून द्यायचं नाही. आम्ही जळगावचा मतदारसंघ भाजपला देत होतो, पण आता त्या जागेवर शिवछत्रपतींचा भगवा लोकसभेत फडकणार आहे.
>> आपलं ध्येय एक आहे. आपला झेंडा भगवा आहे. याआधी जळगावचा मतदारसंघ भाजपला सोडला, आता त्या जळगावमध्ये भगवा झेंडा फडकला पाहिजे.
>> अनेक लोक आहेत, ज्यांना भाजपने वापरून फेकून दिलं, ते आज सोबत येत आहेत. तुम्ही आज हिंमत दाखवली, या विरोधात कोणीतरी आवाज उचलू शकतो. हे दाखवून दिलं. सर्व शांत बसणारे नाहीत. याबद्दल तुमचं अभिनंदन करतो.
>> आपण एकत्र वाटचाल करू. आपल्या विकासाच्या आड येणाऱ्यांची वाट लावून दिल्लीत पोहोचू.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.