Maharashtra Politics: रवी राणा यांचा पक्ष त्यांच्याच पत्नीने फोडला, बच्चू कडू यांचा नवनीत राणांवर प्रहार

Bachchu Kadu On Navneet Rana: रवी राणा यांचा पक्ष त्यांच्याच पत्नीनेच फोडला, असं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना लक्ष्य केलं आहे.
रवी राणा यांचा पक्ष त्यांच्याच पत्नीने फोडला, बच्चू कडू यांचा नवनीत राणांवर प्रहार
Bachchu Kadu On Navneet RanaSaam Tv
Published On

Bachchu Kadu On Navneet Rana:

>> अमर घटारे

रवी राणा यांचा पक्ष त्यांच्याच पत्नीनेच फोडला, स्वाभिमानी पक्ष सोडून त्या भाजपमध्ये सामील झाल्या, असं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना लक्ष्य केलं आहे. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

सध्या अमरावतीत प्रचार सभेच्या मैदानावरून वाद सुरु आहे. प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्यासाठी 24 तारखेला सायन्स कोर मैदान आधीच बुक केलं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्याच मैदानावर नवनीत राणा यांच्यासाठी अमित शाह सभा घेणार. या संदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ''आम्ही 24 तारखेला सभेसाठी मैदान आरक्षीत केलं होत. पण आता प्रशासन आमच्यावर दबाव आणत आहे की, मैदान सोडावं लागेल. प्रशासन आम्हाला फोन करत आहे. ज्यांनी फोन केले त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.''

रवी राणा यांचा पक्ष त्यांच्याच पत्नीने फोडला, बच्चू कडू यांचा नवनीत राणांवर प्रहार
Surat Election Result 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं, सूरतमधून मुकेश दलाल बिनविरोध, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

ते म्हणाले, ''मैदान आरक्षण करण्यासाठी आम्ही पैसे भरले, त्याची पावती आमच्याकडे आहे. मात्र आता मैदान सोडण्यासाठी आमच्यावर दबाव येत आहे. आरक्षित असलेल्या मैदान शक्तीचा वापर करून वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, ही निवडणूक शांततेने झाली पाहिजे असं आम्हाला वाटते.''

बच्चू कडू म्हणाले, ''पोलीस यंत्रणेने मला नोटीस दिली, सत्ताधाऱ्यांच्या गाड्या अडवू नये. सभा उधळून लावणे, हे करू नये, यासाठी मला नोटीस दिल्या. निवडणुकीच्या काळात प्रशासकीय एक बाजू घेऊन, एका पक्षाची बाजू घेऊन बोलत असेल तर हे चुकीच आहे. मी कोर्टात गेलो आहे, कोर्टातून नोटीस दिली आहे. आसेगाव पूर्णा येथील ठानेदाराला नोटीस देणार आहे. आम्हाला जर मैदान मिळालं नाही, तर आम्ही जन आंदोलन उपोषण सुरू करू.''

रवी राणा यांचा पक्ष त्यांच्याच पत्नीने फोडला, बच्चू कडू यांचा नवनीत राणांवर प्रहार
Sangli Loksabha : सांगलीत 'बंडाचा झेंडा' कायम! विशाल पाटील यांची माघार नाहीच; महाविकास आघाडीला धक्का

बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. याबाबत पत्रकारांनी बच्चू कडूंना विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना म्हणजे आतून आमचा मित्र पक्ष आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Edited by Satish Kengar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com