Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu : वेळ आल्यास मोठे पक्ष बाजूला हटवून लहान पक्ष सत्तेत; बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास

Amravati News : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता २३ नोव्हेंबरला निकाल लागून राज्यात सत्तेत कोण बसणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे  
अमरावती
: राज्यात कुणाचेही सरकार स्थापन करण्याची क्षमता कोणामध्ये नाही. आमच्या शिवाय कोणाचेही सरकार स्थापन होणार नाही. वेळ आली तर अपक्ष आणि लहान पक्ष मिळून मोट बांधणी केली; तर मोठे पक्ष बाजूला हटून लहान पक्ष सत्तेत येईल; असा विश्वास प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता २३ नोव्हेंबरला निकाल लागून राज्यात सत्तेत कोण बसणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिवाय मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोल नुसार महायुतीला जास्त जागा दिसत आहेत. यावर बोलताना बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सांगितले, कि एक्झिट पोल हा अंदाज असून निकालाच्या दिवशी समजेल कोण सत्तेत असेल. मात्र सरकार स्थापन करण्याची ताकद कोनात नसल्याचे ते म्हणाले. 

तर लहान पक्षाचा मुख्यमंत्री 

राज्यात प्रहार संघटना व मित्र पक्ष असलेल्या महाशक्तीच्या १५ ते २० जागा निवडून येतील. यामुळे आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही, तर आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊ. मोठ्या पक्षाचे सरकार बनवण्यापेक्षा अपक्ष आणि लहान पक्षाचे सरकार बनू शकते. त्यासाठी पाठिंबा कोणाचा घ्यायचा ते आम्ही ठरवू. अर्थात वेळ पडल्यास लहान पक्षाचा मुख्यमंत्री होईल; असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT