Amravati Airport Saam tv
महाराष्ट्र

Amravati Airport : मुंबईसाठी उड्डाण पुन्हा सुरु; आठ दिवसांपासून बंद होती विमानसेवा

Amravati News : आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी विमानसेवा अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून सुरु करण्यात आली आहे. मात्र आठ दिवसांपासून हि सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती विमानतळावरून सुरु झालेली अमरावती- मुंबई एअर अलायन्सची सेवा मागील आठवड्यापासून ठप्प झाली होती. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर अनेकदा विमानसेवा कोणत्या ना कोणत्या कारणातून बंद होत आहे. यातच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मागील आठ दिवसांपासून हि सेवा बंदच आहे. दरम्यान विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्याने आजपासून ही सेवा पुन्हा एकदा सुरु होत आहे.  

अमरावती येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे बहुप्रतिक्षेनंतर उद्घाटन झाले आहे. १६ एप्रिल २०२५ ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली होती. ही विमानसेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस मुंबई- अमरावती- मुंबई अशा पद्धतीने सुरू होती. अर्थात येथील नागरिकांसाठी हि सेवा सोयीची ठरू लागली आहे. 

अनेकवेळा विमाने रद्द 

दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर मुंबईसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली खरी; परंतु अविरतपणे हि सेवा सुरु राहिली नाही. मागील चार महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यातच २२ ऑगस्टपासून येथील विमानसेवा बंद राहणार असल्याचे एअर अलायन्सकडून सांगण्यात आले होते. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. 

विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त

विमानात असलेला तांत्रिक बिघाड झाल्याने आठवडाभरापासून हि विमानसेवा बंद होती. मात्र विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याने अमरावती- मुंबई सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यामुळे आता १ आणि ५ सप्टेंबर रोजी संकेतस्थळावर विमानाचे बुकिंग झळकले असून अनेकांनी बुकिंग करण्यास सुरवात देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT