

मोदी सरकार बेरोजगारांना ₹2,500 देणार असल्याचा दावा
केंद्र सरकारने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.
बनावट योजना आणि फेक लिंकपासून सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन
पंतप्रधानांच्या नावाने सोशल मीडियावर एका मेसेज व्हायरल होतोय. या व्हायरल मेसेजमध्ये देशातील बेरोजगारांना मोदी सरकार दरमहा अडीच हजार रुपये देणार असल्याचा दावा करण्यात आलाय. केंद्र सरकारनं खरंच ही योजना चालू केली आहे. कोणाला याचा लाभ मिळेल याबाबतचे प्रश्न अनेकजण विचारत आहेत. त्याबाबत सरकारनं नागरिकांना सावध केले आहे.
'प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना' (Prime Minister's Unemployment Allowance Scheme) अंतर्गत सर्व बेरोजगार व्यक्तींना २,५०० रुपये मिळतील, असा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार, ही योजना केंद्र सरकारद्वारे राबवली जात असून तिचा लाभ सर्व बेरोजगार लोकांना मिळणार आहे. परंतु ही अशी कोणतीच योजना केंद्र सराकर राबवत नाहीये.
केंद्र सरकारने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील दावा पूर्णपणे असत्य, बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच, नागरिकांना अशा कोणत्याही फसव्या योजनेला बळी न पडण्याचे किंवा त्यावर आधारित कोणतीही कृती न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशी दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचित करण्यासही सांगितले आहे.
केंद्र सरकारने रविवारी (२ ऑगस्ट २०२६) 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये सरकारने म्हटलंय की, "सोशल मीडियावर एक चित्र शेअर केले जात आहे, ज्यामध्ये असा दावा केलाय की 'प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजने'अंतर्गत सर्व बेरोजगार व्यक्तींना २,५०० रुपये दिले जातील. हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाहीये. "
सरकारने म्हटलंय की, "कृपया सतर्क राहा. कोणत्याही योजनेच्या नावाखाली अनोळखी किंवा पडताळणी न केलेल्या प्लॅटफॉर्मवर आपली बँक माहिती, ओटीपी (OTP), आधार क्रमांक किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा. सरकारी योजनांबाबत अचूक आणि अधिकृत माहितीसाठी myscheme.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या."
"केंद्र सरकारशी संबंधित कोणतीही संशयास्पद प्रतिमा, व्हिडिओ किंवा संदेश @PIBFactCheck कडे पाठवा; आम्ही तुम्हाला वस्तुस्थितीवर आधारित माहिती देऊ." या सोशल मीडिया पोस्टमध्ये सरकारने एक व्हॉट्सॲप क्रमांक (+91 8799711259) आणि एक ईमेल आयडी (factcheck@pib.gov.in) देखील शेअर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.