Accident News : भरधाव डंपरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा महामार्गावर रास्तारोको

Maval News : अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मुंबई- बेंगलोर महामार्ग काही काळ रोखून धरला होता. पोलीस आल्यानंतर नागरिकांची समजूत काढत महामार्ग मोकळा केला
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

मावळ : भरधाव वेगाने आलेल्या डंपरचे दुचाकीला जोरदार धडक देत तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग रोखून धरला होता. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्या नागरिकांची समजूत काढत महामार्ग मोकळा केला होता. 

मुंबई- बेंगलोर नॅशनल हायवेवर भुयारी मार्गाच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे. त्याला पर्यायी रस्ता म्हणून डि मार्ट जवळील अनेक सोसायटी समोरली सर्विस रस्ता अवजड वाहनांना खुला करून देण्यात आलेला आहे. अशातच हा रस्ता अपघाती व जीवघेणा ठरत आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून आज दुपारच्या सुमारास झालेल्या अपघातात एका तरुणाचा बळी गेला आहे. 

Accident News
Electric Shock : बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू; सळई ओढताना घडली दुर्घटना

मागून धडक देत उडविले 

दरम्यान मागील दोन दिवसापासून या रस्त्यावर छोट्या मोठ्या अपघाताची मालिका सुरू झाली आहे. यातच दुपारच्या सुमारास दुचाकी वाहनावरून दीपक साही शिंदे (वय २८) हा पेट्रोल पंपाच्या दिशेने जात असताना साई द्वारका सोसायटी समोरील सर्विस रस्त्यावर मागून येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दीपक हा खाली पडला असता डंपर त्याच्या अंगावरून गेल्याने दिपकचा जागीच मृत्यू झाला. 

Accident News
Nanded : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन विरोधात ओबीसी समाज आक्रमक; घोषणाबाजी करत निदर्शने

संतप्त जमावाचा रास्तारोको 

अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मुंबई- बेंगलोर महामार्ग काही काळ रोखून धरला होता. काही वेळाने पोलीस आल्यानंतर नागरिकांची समजूत काढत महामार्ग मोकळा केला. यानंतर मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय पिंपरी येथे श्रवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com