Amravati Ganesh Visarjan Saam
महाराष्ट्र

'गणरायाला घरी पाठवू नका' चिमुकली हुंदका देत रडली; श्रीजाच्या निरागस श्रद्धेने सर्वांचे मन जिंकले

Amravati Ganesh Visarjan: अमरावतीत चिमुकलीने बाप्पाला निरोप देताना धाय मोकलून रडल्याचा व्हिडिओ व्हायरल. श्रीजा थोरात हिच्या निरागस श्रद्धेने सर्वांचे मन जिंकले.

Bhagyashree Kamble

  • अमरावतीत चिमुकलीने बाप्पाला निरोप देताना धाय मोकलून रडल्याचा व्हिडिओ व्हायरल.

  • श्रीजा थोरात हिच्या निरागस श्रद्धेने सर्वांचे मन जिंकले.

  • थोरात कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक निर्णय – घरीच टबमध्ये विसर्जन.

  • विसर्जनानंतर मातीत झाड लावण्याचा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद.

दहा दिवस गणरायाची मनोभावे पुजा, आरती आणि सेवा केल्यानंतर अखेर गणरायाला निरोप द्यावा लागतो. शनिवारी राज्यातील विविध भागांमध्ये विसर्जन सोहळा पार पडला. भक्तांनी जड अंतःकरणाने गणरायाला निरोप दिला. मात्र, लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना चिमुकल्या धाय मोकलून रडल्या. लहानग्यांचे १० दिवस अगदीच आनंदात जातात. मात्र, गणेश विसर्जनाच्या दिवशी लहानग्यांना अश्रू अनावर होतात. अमरावतीतील चिमुकलीलाही गणरायाला निरोप देताना अश्रू अनावर झाले.

गणपती बाप्पाला निरोप देताना अमरावतीतील चिमुकली धाय मोकलून रडली. श्रीजा थोरात असं चिमुकलीचं नाव आहे. ती अमरावतीच्या विद्यापीठ परिसरातील दत्तविहार कॉलनीतील रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या श्रीजाचा भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये घरातील सदस्य गणपती बाप्पाची आरती करून विसर्जनाची तयारी करत आहेत. याचवेळी चिमुकलीला अश्रू अनावर झाले. घरातील सदस्य गणरायाला आसनावरून उचलून घराभोवती प्रदक्षिणा घालतात. याचवेळी चिमुकली धाय मोकलून रडायला सुरूवात करते.

'गणरायाला घरी पाठवू नका' असं म्हणत जोरजोराने रडू लागते. विसर्जनावेळी ती आईचा पदर खेचून रडते. घरातील सदस्य तिची समजूत काढतात, मात्र ती ऐकत नाही. तिचं रडणं सुरू असतं. सध्या चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. श्रीजाच्या निरागस श्रद्धेने सर्वांचे मन जिंकले आहे.

दरम्यान, थोरात कुटुंबीयांनी पर्यावरणपूरक निर्णय घेत घरच्या घरीच टबमध्ये बाप्पाचे विसर्जन केले. विशेष म्हणजे विसर्जनानंतर त्या मातीत एक झाड लावण्याचा संकल्प त्यांनी केला असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

Maharashtra Live News Update : महात्मा फुलेवाडा आमच्या ताब्यात द्या; राज्य सरकारला समता परिषदेचे पत्र

Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT