
अभिनेत्री निकिता घाग आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल.
निर्मात्याला बंदुकीच्या धाकावर १० लाख रुपये ट्रान्सफर करायला भाग पाडलं.
अंधेरी पश्चिमेतील चित्रलेखा हेरिटेज स्टुडिओमध्ये धक्कादायक प्रकार.
अंबोली पोलिसांनी निकिता घाग, विवेक जगताप आणि इतरांवर कारवाई केली.
बॉलिवूड चित्रपट बनतातच, पण आता अगदी चित्रपटासारखं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. अभिनेत्री निकिता घाग आणि तिच्या साथीदारांनी एका चित्रपट निर्मात्याला अंधेरी पश्चिम येथील कार्यलयात डांबून ठेवून, बंदुकीच्या धाकावर तब्बल १० लाख रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकरणी मुंबईच्या अंबोली पोलिसांनी अभिनेत्रीसह तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार निर्माता कृष्णकुमार वीरसिंह मीणा उर्फ के. कुमार (वय वर्ष ४८) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी अभिनेत्री निकिता घाग काही लोकांसह चित्रलेखा हेरिटेज स्टुडिओ येथे पोहोचली. त्यावेळी निर्माता काही कलाकार आणि मित्रांसोबत केबिनमध्ये होता.
अचानक१० ते १५ जण एकत्र आत घुसले. तसेच शिवीगाळ करत सर्वांना बाहेर काढले. त्यातील एका व्यक्तीने स्वत:ला 'भाई' म्हणवत आपले नाव विवेक जगताप असे सांगितले. निकिता घाग आणि तिच्या साथीदारांनी निर्मात्यावर खोटे आरोप करून बदनाम करण्याची धमकी दिली. तसेच २५ लाख रूपयांची मागणी केली.
निर्मात्यानं विरोध केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी एकाने हवेत चाकू फिरवला. तर, विवेक जगताप यानं पिस्तूल दाखवून निर्मात्याला धाक दाखवला.
निर्माता कृष्णकुमार यांनी सांगितले की, दबावाखाली येऊन आरोपींना १० लाख ट्रान्सफर करावे लागले. एवढेच नाही तर,आरोपीने त्यांच्या कर्मचाऱ्याला एक ईमेल लिहिण्यास भाग पाडले. ज्यात ही रक्कम निकिता घागच्या अभिनय शुल्कासाठी आगाऊ रक्कम पेमेंट असल्याचा उल्लेख होता.
सुमारे तीन तास डांबून ठेवल्यानंतर आरोपींनी धमकी दिली की, पोलिसांशी संपर्क केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. निर्मात्यानं त्यानंतर पोलीस ठाणे गाठले. तसेच घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे निकिता घाग, विवेक जगताप उर्फ दादा आणि त्यांच्या १० ते १५ अज्ञात लोकांविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.