
ही घटना केरळमधील कोची येथील बसमध्ये घडली.
महिलेने व्यक्तीच्या अश्लील वागणुकीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला.
ती पारंपरिक केरळ साडी नेसून पूर्णपणे झाकून बसमध्ये प्रवास करत होती.
काही लोक महिलांच्या कपड्यांवर बोट ठेवतात, हे चुकीचं आहे हे दाखवण्यासाठी व्हिडिओ
केरळमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कटेंट क्रिएटर तरूणीला एका वृद्धाच्या भयंकर कृत्याला सामोरे जावे लागले आहे. बसमध्ये वृद्ध व्यक्तीनं कटेंट क्रिएटर तरूणीसोबत अश्लील वागणूक दिली. वृद्ध व्यक्ती वारंवार तरूणीकडे अशोभनीय नजरेनं पाहत होता. महिलेनं संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तसेच व्हायरल केला आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी वृद्ध व्यक्तीच्या कृत्याला कमेंटद्वारे झापलं. सध्या या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ कोची येथील असल्याची माहिती आहे. कंटेंट क्रिएटरनं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बस दिसत आहे. बसमधून कटेंट क्रिएटर तरूणी प्रवास करीत आहे. तरूणीच्या शेजारी एक वृद्ध व्यक्ती बसलेले आहेत. तो व्यक्ती वारंवार तिच्या अंगाकडे एकटक पाहताना दिसतो आहे.
तरूणीनं साडी नेसली होती. वृद्ध व्यक्ती तिच्या ब्लाऊजकडे वाकून - वाकून पाहत होता. तरूणीला कळताच तिनं मोबाईलचा फ्रंट कॅमेरा चालू केला. तसेच तरूणीनं त्या व्यक्तीला त्याच्या अशोभनीय नजरेची जाणीव करून दिली होती. त्यानंतरही वृद्ध व्यक्तीनं आपली वागणूक थांबवली नाही.
महिलेनं संपूर्ण प्रकार मोबाईच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत, 'जर तू माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघशील, तर तुझे डोळे मी बाहेर काढेन. असं मी त्या व्यक्तीला स्पष्ट म्हटलं. त्यानंतर मी बसमधून उतरले', अशी माहिती तरूणीनं व्हिडिओतून दिली.
तिनं व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हा व्हिडिओ मी शेअर करत आहे. कारण काही लोक कायम महिलांच्या कपड्यांवरून बोलतात. या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे झाकलेले आहे. साडी नेसली आहे. तरी सुद्धा अशी वागणूक मला मिळतेय', असं तरूणी म्हणाली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.