Amravati suspended Talathi house firing latest news saam tv
महाराष्ट्र

तलाठी ठाकरेंच्या घराबाहेर अज्ञातांचा गोळीबार; अमरावतीत खळबळ

Amravati Firing: अमरावतीच्या अर्जुन नगरमध्ये निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घराबाहेर अज्ञातांनी दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Bharat Jadhav

  • अमरावतीच्या अर्जुन नगरमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली.

  • निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घराबाहेर दोन गोळ्या झाडण्यात आल्या.

  • गोळीबार करणारे अज्ञात आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

अमरावती शहर मध्यरात्री झालेल्या गोळीबार झाल्याची घटना घडलीय. एका निलंबित तलाठ्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या अर्जुन नगर भागात राहणाऱ्या विपुल ठाकरे यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी दोन गोळ्या झाडल्या. दरम्यान गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान गोळीबार करणारे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नेमकी घटना काय?

अज्ञात हल्लेखोर रविवारी रात्री विपुल ठाकरे यांच्या अर्जून नगर परिसरातील घरासमोर आले. त्यांनी प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर गोळीबार केला. घराच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. प्राथमिक तपासात या गोळ्या घराच्या भिंतीला लागल्याचे निदर्शनास आले. ही घटना घडली, तेव्हा ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य हे घराच्या आत होते. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. हल्लेखोर लगेच पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गाडगेनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके आणि श्याम घुगे, सहायक पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हणे, गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश दहातोंडे, अतुल वर हे तत्काळ पथकासह घटनास्थळी पोहचलेत.

गोळीबार कशासाठी केला?

विपुल ठाकरे यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार कशासाठी केला, याचा तपास केला जातोय. विपुल ठाकरेंना धाक दाखवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले की त्यांना जिवे मारण्याचा कट होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. पोलीस दप्तरी विपुल ठाकरे याची फरार म्हणून नोंद आहे. विपुल ठाकरे यांच्या विरोधात अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा आणि पैसे उकळल्याचा आरोप एका महिलेने केलाय. या प्रकरणी विपुल ठाकरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विजय चौधरी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ

अंगणवाडी शाळेच्या आवारात भानामतीसदृश प्रकार; पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

श्रावणात ‘या’ एका भाजीचे करा सेवन; आरोग्य राहील ठणठणीत

Mens Beauty : पिळदार मिश्या आणि दाट दाढी हवी असेल तर.. या टिप्स करा फॉलो

नाशिकमध्ये मास्तरांचा 22 वर्ष सुरू होता गैरप्रकार; बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन घेणाऱ्या 11 शिक्षकांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT