

नाशिकच्या देवळाली कॅम्पमधील डॉ. सुभाष गुजर हायस्कूल चर्चेत
बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतननिश्चिती
आरोपावरून ११ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये शिक्षकांच्या वेतननिश्चितीशी संबंधित कथित गैरप्रकाराचे धक्कादायक प्रकरण समोर आलंय. देवळाली कॅम्प येथील डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमधील तब्बल ११ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांनी वेतननिश्चिती करून घेतली होती. या संबंधित शिक्षकांनी आवश्यक शासकीय मान्यता आणि अधिकृत पत्रव्यवहार नसतानाही कागदपत्रांचा आधार घेत वेतननिश्चिती करून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.
२००१ ते २०२२ या काळात हा प्रकार सुरू होता,असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर देवळाली कॅम्प पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित ११ शिक्षकांविरोधात आर्थिक फसवणुकीसह बनावट कागदपत्रांशी संबंधित आरोपांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. २००१ पासून २०२२ पर्यंत संबंधित शिक्षकांनी आवश्यक कायदेशीर मंजुरी न घेता वेतननिश्चिती करून घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय.
विशेष म्हणजे वेतननिश्चितीसाठी आवश्यक असलेला अधिकृत शासकीय पत्रव्यवहार किंवा मान्यता ठराव संबंधित कार्यालयांकडे देण्यात आला नव्हता. तरीही वेतननिश्चिती झाल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे केवळ शाळा व्यवस्थापनाचीच नव्हे, तर शासकीय यंत्रणेची आणि सार्वजनिक पैशांचीही फसवणूक झाली का? असा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झालाय.
फिर्यादीनुसार, जिल्हा परिषद तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे अधिकृत पत्रव्यवहार किंवा मान्यता ठराव सादर करण्यात आला नव्हता. तरीही संबंधित शिक्षकांनी कथितरीत्या खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे वेतननिश्चिती करून घेण्यात आली का, त्यातून नेमका किती आर्थिक लाभ झाला आणि या प्रक्रियेत आणखी कोणाचा सहभाग होता, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.