Amravati Saam Tv News
महाराष्ट्र

Amravati Crime : मित्रासोबत बाहेर जाताना घेरलं, माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; मस्साजोगचं लोण हळूहळू इतर जिल्ह्यात

Daryapur violence latest updates: अमरावतीच्या उपराई येथील माजी सरपंच यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसून, गावकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्येच्या घटनेची आग अजूनही धगधगत आहे. आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. आरोपी मोकाट असून, त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी, नेते मंडळींपासून सामान्य व्यक्तीही करत आहेत.

अशातच आणखी एका माजी सरपंच यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या उपराई येथील माजी सरपंच यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसून, गावकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील उपराई येथील माजी सरपंच यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. नीरज नागे असे माजी सरपंच यांचं नाव असून, त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीमध्ये लाभार्थ्यांचं नाव न आल्यामुळे माजी सरपंच यांना मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सायंकाळी मित्रासोबत घराबाहेर जात असताना काही लोकांनी नीरज नागे यांना घेरलं. नंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मारहाण झाल्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचार घेण्यासाठी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर असल्यानं अमरावती येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं.

या संतापजनक प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने गावातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जातोय. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी देखील होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT