Amravati Daryapur Accident News Saam TV
महाराष्ट्र

Amravati Accident : अमरावतीच्या दर्यापूरमध्ये भीषण अपघात; १५ प्रवाशांनी भरलेली रिक्षा थेट नदीपात्रात कोसळली

Amravati Daryapur Accident News : दर्यापूर येथून प्रवाशांना घेऊन रामगाव मार्गे कोळंबीला निघालेली रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट नदीपात्रात कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गुरुवारी (ता. २६) सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. दर्यापूर येथून प्रवाशांना घेऊन रामगाव मार्गे कोळंबीला निघालेली रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट नदीपात्रात कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नजीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे.

सुखदेव इंगळे (वय ७०, राहणार कोळंबी) असं मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचं नाव आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या नदीपत्रावरील पुलाला संरक्षण भिंत नसल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे. सदर घटनेने परिसरात एकर खळबळ उडाली असून आता या घटनेचा पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दर्यापूर येथे आठवडी बाजार होता. या बाजाराला तालुक्यातील काही नागरिक आले होते. यावेळी बाजार करून रिक्षाने परतत असताना रामगाव येथील चंद्रभागानदी पात्राजवळ सदर रिक्षाचालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले. काही क्षणातच रिक्षा थेट नदीत जाऊन कोसळली. यात १५ पैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

भंडाऱ्यात टेम्पो पुलावरून कोसळला

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खांबा-वडेगाव मार्गावर पहाटे 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भजन मंडळींना घेऊन निघालेला टेम्पो पुलावरून थेट नाल्यात कोसळला. या अपघातात टेम्पोमधील दोन वर्षीय आणि पाच वर्षीय अशा दोन मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात. तर 13 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच साकोली तहसीलदार निलेश कदम हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी सहाय्याने नाल्यात पडलेला टेम्पो बाहेर काढण्यात आला. सध्या एसडीआरएफ च्या पथक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलींचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budhwar che Upay : बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाचे 'हे' उपाय करा; नशीब बदलण्यास वेळ लागणार नाही

Maharashtra Live News Update : वर्धा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट

Shravan 2025: श्रावण महिन्यात शिवलिंगावर कसे अर्पण करावे बेलपत्र? जाणून घ्या योग्य पद्धत

Sangli Crime: सांगली हादरली! दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, घाबरलेल्या मुलीनं संपवलं आयुष्य

शिंदेंचे आमदार टॉवेल, बनियनवर आले अन् कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारले, दादागिरीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT