Amravati Crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime : अमरावती हादरले; मुलासह आईची निर्घृण हत्या, बदलाच्या भावनेतून घरासमोर येत केले शस्त्राने वार

Amravati News : मायलेकाची हत्या करून दोघेजण तिवसा पोलीसांच्या स्वाधीन झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. तर दोन्ही आरोपी विरुद्ध गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: शेजारी राहणाऱ्या दोन परिवारांमध्ये जुना वाद होता. या वादातून बापाच्या हत्येचा बदला घेण्याच्या भावनेतून भयानक कृत्य करण्यात आले आहे. यात शेजाऱ्यांनी मुलासह आईचा घरा समोरच चाकू भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. सदरची घटना तिवसा शहरात घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील अशोकनगर परिसरात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सदरची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अमोल वसंतराव डाखोरे (वय ४०) व सुशीला वसंतराव डाखोरे (वय ५८) असे घटनेत मृत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. तर या घटनेत एक दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बदल्याच्या भावनेतून भयानक कृत्य 

घटनेत हत्या करणारे हे घरा शेजारी राहणारे आहेत. काही वर्षांपासून दोन्ही परिवारांमध्ये वाद होता. या वादात मारेकरींच्या कुटुंबातील एका सदस्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा राग मनात असल्याने यातून आज सकाळी दोन्ही परिवारांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादातून घराच्या समोरच चाकूने सपासप वार करत निर्घृन हत्या करण्यात आली आहे. यामध्ये दहा वर्षाचा मुलगा देखील जखमी आहे. 

दोघे स्वतःहून पोलिसात दाखल 

मायलेकाची हत्या करून दोघेजण थेट तिवसा पोलीसांच्या स्वाधीन झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. तर दोन्ही आरोपी विरुद्ध गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

मला फरफटत नेलं, त्यातील दोन पोलीस कानात सांगत होते, हे सरकार..; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट, एकच खळबळ

Jalgaon Crime: जमिनीच्या वादातून पुतण्याने घेतला काकाचा जीव, काठीने डोक्यावर हल्ला करत जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT