Maval : रिंग रोड, टीपी स्कीमला मावळच्या शेतकऱ्यांचा विरोध; शेतकरी मेळाव्यात एकमताने ठराव

Maval News : सर्व बागायत जमीन आहे. ऊस मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. मात्र सरकारने आडमुठ भूमिका घेऊन या दोन नवीन स्कीप आणल्या त्याला आमचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

मावळ : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणने ६५ मीटर रिंग रोड व बाह्य वळण मार्ग (TP) प्रस्तावित केला आहे. हे रस्ते झाल्यास यात शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी मोठ्या प्रमाणात जाणार आहेत. यामुळे सदरचे मार्ग रद्द करावे; अशी मागणी मावळच्या शेतकऱ्यांनी केली आहे. दारुंबरे येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात एकमताने हा ठराव पास करण्यात आला आहे.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण कडून प्रस्तावित असलेली या रिंगरोड व बाह्य वळण रस्त्याला शेतकऱ्यांचा विरोध असून मावळमध्ये झालेल्या मेळाव्यात दारुंबरे, सांगवडे, गोळुंब्रे, साळुंबरे, धामणे, व नेरे या गावातील हजारो शेतकरी यावेळी उपस्थित होते. यात सर्व बागायत जमीन आहे. ऊस मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. मात्र सरकारने आडमुठ भूमिका घेऊन या दोन नवीन स्कीप आणल्या त्याला आमचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. 

Maval News
Solapur : १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील धक्कादायक घटना

मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, दोन्ही योजना अन्यायकारक आहेत. शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू. पण काही लोक माझ्या विरोधात षडयंत्र करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या विरोधात बोललात. तर मी त्याच्या मागे लागेल. राजकारण करायचं नाही म्हणतात आणि मागून काड्या करतात. ह्या शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्वास असतील तर मला तो विश्वास टिकवता आला पाहिजे.

Maval News
Crop Insurance : शेतकऱ्यांना विम्याची तुटपुंजी रक्कम; पिक विमा प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी घातला घेराव

कायम शेतकऱ्यांसोबत राहणार 

उद्याच्या काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री यांना आपण भेट घेऊ या. उद्या अजित दादांनी सांगितलं हा प्रकल्प होऊ दे तरीही मी तुमच्यासोबत राहणार आहे. तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, मी या शेतकऱ्यांसोबत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या शेतकऱ्यांना घेऊन मीटिंग करून हा प्रश्न सोडवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com