Amol Mitkari On Ajit Pawar Death Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death : दादांची शप्पथ! …तर त्याच्या घरात चिता जाळायला कुणी शिल्लक राहणार नाही, आमदाराचा थेट इशारा

Ajit Pawar Baramati Plane Crash: ब्लॅक बॉक्सचा डेटा समोर आल्यानंतर अजित पवार यांच्या विमान अपघातात घातपाताचा संशय असल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Amol Mitkari warning on Ajit Pawar plane crash : ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक केल्यानंतर घातपाताचा संशय दिसला, तर दादांची शप्पथ घेऊन सांगतोय, त्याच्या घरात त्याची चिता जाळायला कुणीचं शिल्लक राहणार नाही, ही धमकी किंवा इशारा समजा, असे आमदार अमोल मिटकरी स्पष्टच बोलले. साम टीव्हीसोबत बोलताना मिटकरी यांनी अजित पवार यांच्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. 'अजित दादांची लाडकी बहीण योजना' असं नाव या लाडकी बहीण योजनेला देण्यात यावं, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावर अनेकदा शंका उपस्थित केली आहे. अजितदादा हे महाराष्ट्रातील लोखो लोकांचं श्रद्धास्थान आहे, त्यांच्या मृत्यूची बातमी महाराष्ट्र पचवू शकला नाही. अजितदादांच्या हातातील हातातील घड्याळ गायब असल्याचा संशय कालच उपस्थित केला होता. आज तुमच्या चॅनलने बातमी दाखवली की दादांची ओळख हातातील कपड्यामुळे झाली. यात जर घातपाताचा संशय दिसला, तर त्याच्या घरात चिता जाळायाला कुणी शिल्लक राहणार नाही, असा इशारा मिटकरींनी दिला.

विमान अपघाताच्या घटनेआधीच्या दोन ते तीन दिवसापूर्वीची अजित दादांची भाषणे बघितली. ते म्हणत होते माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही, आम्ही तुम्ही परमनंट जन्माला आलेलो नाही.. त्यांना चाहूल लागली होती कां?,.. शपथ घेऊन सांगतोय अपघातामागे काळबेरं असलं तर आम्ही पण पुढच्या परिणामाची चिंता करणार नाही, असे मिटकरी म्हणाले.

दादांचं ओळख पटल्याचं कारण म्हणजे दादांच्या पायला फंगल इन्फेक्शन होतंये, त्यामुळं सुरुवातीला दादांची ओळख पटली. दादांचा शंकर नावाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता, तो दररोज दादांच्या पायाला तेल लावून द्यायचा. पायावरील फंगल इन्फेक्शन मुळेचं दादांची ओळख पटली, असा दावा मिटकरींनी केला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित दादांचे स्मृति जपण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजित दादांचं नाव द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye cancer symptoms: ही लक्षणं दिसू लागली तर समजा डोळ्यांच्या कॅन्सरची होतेय सुरुवात; वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पंकजा मुंडेंच्या दोन सभा, हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने सभेला उशीर

Paithani Price: महिलांना झटका! पैठणीची किंमत वाढली; VIDEO

Mumbai Road Trip: लोणावळा-खंडाळा झाले जुने; मुंबईजवळची 8 हिडन ठिकाणं पाहून थक्क व्हाल, पार्टनसोबत रोड ट्रिप करा एन्जॉय

Methi Thalipeeth: मुलांच्या नाश्त्यासाठी खरा खमंग मेथी थालीपीठ, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT