Amit Shah Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

Hingoli Khasdar Nagesh Patil : अमित शहांनी हिंगोलीचे शिवसेना खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

Namdeo Kumbhar

  • अमित शहा यांनी शिवसेना (उद्धव गट) खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  • ठराविक खासदारालाच शुभेच्छा देणं, आणि उद्धव ठाकरेंना न देणं यामुळे राजकीय चर्चांना ऊत

  • शुभेच्छांचा फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • हिंगोलीत मोठी चर्चा सुरू आहे.

Amit Shah Calls Uddhav Thackeray’s MP : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला फोन करून शुभेच्छा दिल्याने हिंगोलीमध्ये एकच चर्चा सुरू झाली. अमित शाह यांची कोणती राजकीय खेळी आहे का? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांचाही रविवारी ६५ वा वाढदिवस होता, पण शाह यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या नाहीत. पण हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना अमित शाह यांनी स्वत: फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस झाला. कार्यकर्त्यांनी आष्टीकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. आष्टीकर याना गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंगोलीमध्ये ठाकरे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाह कोणती राजकीय खेळी करणार का? असा काहींचा सूर हिंगोलीमध्ये ऐकायला मिळत आहे. या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत राजकारणावर आणि भाजपच्या आगामी रणनीतीवर चर्चा रंगली आहे.

अमित शाह यांचा ठाकरेंच्या खासदाराला फोन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी हिंगोलीचे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नागेश पाटील समर्थकांनी शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच तो व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसतानाच अमित शाहांनी नागेश पाटीलांना शुभेच्छा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरेंकडूनही आष्टीकरांना शुभेच्छा -

उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिलेदारांनाही वेळात वेळ काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे आणि आष्टीकर यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर रांगा लागल्या होत्या. व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीचे खासदार आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडिओ समोर आला आहे. आष्टीकर यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा

Fatty liver: लिव्हरवरची चरबी काढून टाकतील 'या' ५ भाज्या, आजपासून करा आहारात समावेश

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार ₹18 लाख एरियर? जाणून घ्या गणित

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT