poladpur mahabaleshwar ambenali ghat, raigad, satara saam tv
महाराष्ट्र

Ambenali Ghat : आंबेनळी घाट 15 दिवस वाहतुकीसाठी बंद : जिल्हाधिका-यांचा आदेश

प्रवाशांच्या सुरक्षितेतसाठी जिल्हा प्रशासनाने आंबेनळी घाटातील वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Siddharth Latkar

Raigad News : पोलादपूर - महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आलेला आहे. त्याबाबतचा आदेश रायगड जिल्हाधिका-यांनी काढला आहे. (Maharashtra News)

रायगड आणि सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावासाची संततधार सुरु हाेती. आज (शनिवार) दाेन्ही जिल्ह्यांत पावसाने उसंत घेतली आहे. गेल्या आठवडाभर पावसामुळे सातारा जिल्ह्यात तसेच रायगड जिल्ह्यात घाट रस्त्यांवर दरडी काेसळण्याच्या घटना झाल्या. विशेषत: पोलादपूर - महाबळेश्वरच्या आंबेनळी घाट (ambenali ghat marathi news) रस्त्यात दरडी पडल्याने वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्या.

दरम्यान पोलादपूर - महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता हा सद्य:स्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीकरीता पुढील १५ दिवस पुर्ण बंद करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला. त्यानूसार हा घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी रायगड- अलिबाग संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

दरम्यान पाऊस, भुस्खलन, दरड कोसळणे या परिस्थितीबाबत वाहतुकीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेऊन हा घाट रस्ता बंद ठेवण्याच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल (poladpur mahabaleshwar ambenali ghat) दर १५ दिवसांनी पोलिस अधीक्षक कार्यालय, रायगड अलिबाग व उपविभागीय अधिकारी महाड यांनी सादर करावा.

त्याबाबतची सूचना देण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी रायगड- अलिबाग संदेश शिर्के यांनी दिले आहेत. दरम्यान बंदी काळात आंबेनळी घाटातून नागरिकांनी वाहतुक करु नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT