Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: लेकरासाठी आईची जीवाची बाजी; दोन हात करत बिबट्याला पांगविले

Ambegaon Pune : लेकरासाठी आईची जीवाची बाजी; दोन हात करत बिबट्याला पांगविले

रोहिदास गाडगे

आंबेगाव (पुणे) : पोटच्या मुलासाठी आई काय करू शकते याचा प्रत्यय आंबेगाव (Ambegaon) येथे आला. बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात लेकराला गमवावे लागेल या विचारातून आपला जीव गेला तरी चालेल पण लेकराला वाचवू; या भावनेतून जीवाची पर्वा न करता माता बिबट्याशी लढायला आली व मातेपुढे बिबट्याने धूम ठोकली. (Latest Marathi News)

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे मेंढपाळाच्या कळपाजवळ खेळत असलेल्या चिमुकल्या मुलावर बिबट्याने जीवघेणा (Leopard Attack) हल्ला केला. तेवढ्यात आईनं पोटच्या लेकराला वाचविण्यासाठी केलेल्या आक्रोशामुळे अखेर बिबट्याने धुम ठोकली. मात्र सात महिन्याचा चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

परिसरात बिबट्याचा वावर 

गेलय काही दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. शिवाय बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amaravati Politics: मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?

Homemade Toner : तुम्हाला त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे? मग हे ५ स्वस्तात मस्त टोनर घरीच बनवा

Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT