Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath : दुचाकीस्वाराची बस चालकाला दगडाने मारहाण; चालक गंभीर जखमी

Ambarnath News : ट्रॅफिकमुळे पुढे जायला जागा नसल्याने दुचाकीस्वाराला थांबण्यास सांगितले. याचा राग आल्याने मित्राला बोलावून बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील खोणी- तळोजा रस्त्यावरील उसाटणे गावाजवळ एका खाजगी बस चालकाला दुचाकी स्वाराने दगडाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत बस चालक धीरज भोपी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बसमधील एका प्रवाशाने मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरात चित्रित केला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील खोणी- तळोजा रस्त्यावर सदरचा प्रकार घडला आहे. दरम्यान या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे मागे असलेल्या दुचाकी धारकाने बस चालक धीरज भोपी याला बस बाजूला कर मला पुढे जाऊ दे असं म्हटलं. मात्र ट्रॅफिकमुळे पुढे जायला जागा नाही; तू थोडा थांब असं सांगितले. याचा दुचाकी स्वाराला राग आला आणि त्याने बस चालक धीरज याला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. 

मित्राला बोलावत केली मारहाण 

तसेच तू उसटणे नाक्यावर थांब; असे सांगून त्याने फोन करून त्याच्या मित्राला बोलवले. त्यानंतर त्यात दुचाकीस्वार आणि त्याच्या मित्राने बस चालक धीरज भोपी याला दगडाने बेदम मारहाण केली. या महाराणीत चालकाच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ बसमधील एका प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान या मारहाणी प्रकरणी धीरज भोपी याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दररोज असे वाद होत असतात. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - एकवीस दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता..

Local Body Election: राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होणार? अशी असू शकते निवडणूक प्रक्रिया

Dhule News: धुळ्यात अपघाताचा थरार! दोन ट्रकची जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर ७० बकऱ्या मृत्यूमुखी

Face Care: टॅनिंगपासून ते डागांपर्यंत...; घरातील 'या' एका गोष्टीमुळे चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लम होतील दूर, मिळेल ग्लोईंग स्किन

Hormonal Changes : पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीमुळे महिलांच्या आतड्यांवर होणारे परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT