Akola Crime : दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या; मारेकरी मृतदेहाजवळ जाऊन झोपला, अकोला जिल्हा रुग्णालयातील घटना

Akola News : अकोला सामान्य रुग्णालयाच्या आवारात धक्कादायक घटना समोर आली असून मृतक आणि मारेकरी मजदूर होते, दैनंदिन काम करून आपला उदरनिर्वाह करायचे. मात्र किरकोळ कारणातून वाद होऊन भयंकर कृत्य केले
Akola Crime
Akola CrimeSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : दोघांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अकोला शासकीय रुग्णालय आवारात घडली आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मारेकरीस ताब्यात घेतले आहे. 

अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात पहाटे चार वाजेच्या सुमारास हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मृतकाचे नाव राजू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेतील मृत व्यक्ती आणि मारेकरी हे एकमेकांना ओळखत होते. मात्र रात्री रुग्णालयाच्या आवारात असताना दोघांमध्ये काही तरी क्षुल्लक कारणातून वाद निर्माण झाला. या वादातून एकाने डोक्यात दगड टाकून हत्या केली. 

Akola Crime
Accident News : बसमधून खाली उतरताच घडले भयानक; घराजवळच महिलेला एसटीने चिरडले

हत्येनंतर मृतदेहाजवळ जाऊन झोपला 

दगडाने ठेचून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. इतकेच नाही तर खून केल्यानंतर मारेकर्‍याने शासकीय रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला होता. त्यानंतर ज्याची हत्या केली त्याच्याच शेजारी जात झोपला होता. हा संपूर्ण प्रकार आज अकोला शासकीय रुग्णालयात पहाटे 4 वाजता सुमारास घडला आहे. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या मारेकऱ्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Akola Crime
Shirdi Sai Sansthan : शनी शिंगणापूरनंतर साई संस्थानच्या नावाने बनावट वेबसाईट; भाविकांची आर्थिक फसवणुक केल्याचे उघड

दुचाकीस्वाराची खाजगी बस चालकाला दगडाने मारहाण
अंबरनाथ तालुक्यातील खोणी तळोजा रस्त्यावरील उसाटणे गावाजवळ एका खाजगी बस चालकाला दुचाकीस्वाराने दगडाने मारहाण केली आहे. या मारहाणीत बस चालक धीरज भोपी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बसमधील एका प्रवाशाने मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरा चित्रित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com