Ambarnath Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Ambarnath News: हृदयद्रावक घटना! पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का; ३ कामगारांचा मृत्यू

Ambarnath News: अंबरनाथ जवळील जांभूळ गावात विजेचा धक्का लागून तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अजय दुधाणे

Ambarnath Breaking News:

अंबरनाथमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंबरनाथ जवळील जांभूळ गावात विजेचा धक्का लागून तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथमध्ये जांभूळ गावात पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. यावेळी टाकीतून पाणी उपसण्याचे काम सुरू असताना पाणी उपसा करणाऱ्या मोटारमधून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे कामगारांना विजेचा धक्का बसला ज्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गुलशन मंडल, राजन मंडल आणि शालिग्राम कुमार मंडल अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

SCROLL FOR NEXT