Bhaskar Jadhav: मुख्यमंत्र्यांवर भाजपचा दबाव, स्वत: च्या मुलाचीही उमेदवारी जाहीर करु शकत नाहीत; भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Politics News: भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे अनेक ठिकाणी उमेदवारही बदलावे लागल्याचे बोलले जात आहे. यावरुनच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
Shivsena Bhaskar Jadhav, Eknath Shinde File Photo
Shivsena Bhaskar Jadhav, Eknath Shinde File PhotoSaam TV
Published On

पराग ढोबळे, नागपूर|ता. ४ एप्रिल २०२४

Bhaskar Jadhav On CM Eknath Shinde:

शिवसेना शिंदे गटाचे अनेक विद्यमान खासदारांची तिकीटे कापण्यात आल्याने शिंदेंच्या गोटात नाराजी असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे अनेक ठिकाणी उमेदवारही बदलावे लागल्याचे बोलले जात आहे. यावरुनच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे स्वतःच्या मुलाची उमेदवारी देखील जाहीर करू शकत नाहीत. भाजपचा मुख्यमंत्री शिंदेंवर प्रचंड दबाव आहे. एकनाथ शिंदे यांना 13 जागा मिळवणे शक्य नाही, विधानसभेत त्यांची परिस्थिती आणखी वाईट होईल. यवतमाळ,रामटेक,मावळ ची जागा शिंदेंना सोडव्या लागल्या,भाजपने 25 जागा जाहीर केल्या,मात्र शिंदेंना मुलाची उमेदवारी जाहीर करणे अवघड झाले आहे, असा टोला भास्कर जाधव यांनी लगाावला आहे.

मैत्रीपुर्ण लढतीत अर्थ नाही..

यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी काँग्रेस- ठाकरे गटात सुरू असलेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली. "माझ्या पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मैत्रीपूर्ण लढतीविषयी सांगितले आहे. मैत्रीपूर्ण लढत म्हणजे मैत्री पूर्ण होईल तेव्हा लढत सुरू होईल असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नाही," असे भास्कर जाधव म्हणालेत.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivsena Bhaskar Jadhav, Eknath Shinde File Photo
Manmad Bajar Samiti : मनमाड बाजार समिती बंद; हमाली, तोलाई, भराई कपात संदर्भाचा निर्णय लांबला

त्याचबरोबर "पूर्व विदर्भात सर्व जागा काँग्रेसला सोडलेल्या आहेत. रामटेकची सातत्याने निवडून आलेली जागा शिवसेनेने सोडली. याचा विचार महाविकास आघाडीचे नेते करतील. रामटेकसाठी 100 टक्के शिवसैनिक लढतील," असेही भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यावेळी म्हणालेत. (Maharashtra LOksabha Election 2024)

Shivsena Bhaskar Jadhav, Eknath Shinde File Photo
Konkan Politics: नारायण राणेंची जय्यत तयारी, उदय सामंतांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा; तिढा वाढला (Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com