Crime News Saam tv
महाराष्ट्र

Amravati: गर्भवती महिलेच्या पोटावर अन् गुप्तांगावर मारल्या लाथा, दातही पाडले; आशा वर्करकडून अमानुष मारहाण

ASHA Worker Beating Pregnant Woman and Husband: घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून एका आशा वर्करने तीन महिन्यांची गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर गंभीर हल्ला केला.

Bhagyashree Kamble

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. डोमा गावात घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून एका आशा वर्करने तीन महिन्यांची गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेला पोटावर आणि गुप्तांगावर जबरदस्त मारहाण करण्यात आली, तसेच तिचे दातही पाडण्यात आले. हल्लेखोर महिला इतक्यावरच थांबली नाही. तिने पीडित महिलेच्या पतीवरही लाकडी काठीने हल्ला करून गंभीर जखमी केले. सध्या दोघांवर चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा गावात धक्कादायक घटना घडली. घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून एका आशा वर्करने थेट तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अमानुष हल्ला केला आहे. आशा वर्कर या महिलेने पीडित महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगावर वार केले आहेत. तसेच तिचे दातही पाडले. नंतर तिच्या पतीला लाकडी काठीने मारहाण केली.

या मारहाणीत पीडित महिला आणि तिचा पती गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर त्यांना तातडीने चुरणी येथील ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलेय. या हल्ल्यात महिलेसह पती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी संबंधित आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

मात्र, आता ज्या आशा वर्कर्सना महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी असते, त्याच आशा वर्करकडूनच असा अमानवी प्रकार घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे. मेळघाटातील आदिवासी महिलांनी अशा परिस्थितीत विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सध्या या प्रकरणानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी होणार मतदान

UPI New Feature VPA: पैसे ट्रान्सफर होतील झटपट; अकाउंट नंबर नसला तरी पाठवता येणार पैसे

लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

Rice Eating Tips : दुपारी की रात्री; भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT