Sangli, kupwad, amar jadhav saam tv
महाराष्ट्र

Sangli News : सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून निर्घृण खून; सांगलीत आठवड्यातील तिसरी खूनाची घटना

दरम्यान सांगली शहरामध्ये गेल्या आठ दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत.

Siddharth Latkar

Sangli Crime News : सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करत सांगलीच्या (sangli) कुपवाड जवळच्या बामणोली (bamnoli) येथे निर्घृण खून करण्यात आला आहे. अमर उर्फ गुट्ट्या जाधव (amar jadhav sangli), असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. मात्र हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये (kupwad midc police station) गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने कुपवाड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

मृत अमर जाधव हा आपल्या दुचाकीवरून कुपवाड नजीक असणाऱ्या बामणाेली येथील आपल्या घरी निघाला असता दुचाकीवरून हल्लेखारांनी पाठलाग करत रस्त्यावर अडवून काही कळायच्या आतच धारदार शस्त्रांनी जाधव याच्यावर एकामागून एक वार केले.

ज्यामध्ये त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी हल्लेखारांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.

मृत अमर जाधव उर्फ गुट्ट्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे देखील दाखल आहेत. त्यामुळे गुन्हेगारीतून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र खुनाच्या घटनेमुळे शहरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सांगली शहरामध्ये गेल्या आठ दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar: डिसेंबर महिन्यात ७ ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

SCROLL FOR NEXT