Alibag News Saam tv
महाराष्ट्र

Alibag News : अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; परदेशी नागरिकांची केली जात होती फसवणूक

Alibag News : रात्रीच्या वेळी २० ते २५ तरुण कॉल सेंटर चालवत होते. इथून अमेरिका व इतर देशांमध्ये फोनवरून संपर्क साधत

Rajesh Sonwane

सचिन कदम 
अलिबाग
: अलिबागमध्ये हॉटेलच्या नावाखाली अवैधपणे कॉल सेंटर चालविले जात होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत रात्री उशिरा कारवाई करून हा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे.  

अलिबागपासून (Alibag News) जवळच असलेल्या परहुर पाडा या ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली हे कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात होती. या ठिकाणी रात्रीच्या वेळी २० ते २५ तरुण कॉल सेंटर चालवत होते. इथून अमेरिका व इतर देशांमध्ये फोनवरून संपर्क साधत आणि त्यांना सेक्स संबंधित गोळ्या, औषधे पुरवतो; असे सांगून त्यांच्याकडून पैशांची ऑनलाईन लूट केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.  

या प्रकाराबाबत पोलिसांना (Alibag Police) माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली. अलिबाग पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई केली असून पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पोलिसांकडून काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून या कॉल सेंटरमधून किती जणांची फसवणूक केली, याचा तपास केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

Pune Land Scam: पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया|VIDEO

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

Pune Accident: कुंडेश्वर अपघाताची पुनरावृत्ती! चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला; ८ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT