अकोला जिल्हा परिषदेच्या ५२ सर्कलसाठी आरक्षणाची प्रारूप अधिसूचना जाहीर
अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग व महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित
१७ ऑक्टोबरपूर्वी तहसीलदार कार्यालयात सादर कराव्या लागणार
आरक्षण प्रक्रिया जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
अक्षय गवळी, साम टीव्ही
अकोला : जिल्हा परिषदेच्या 52 सर्कलसाठी आज आरक्षण सोडत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत नियोजनभवनात काढण्यात आली. त्यानुसार प्रारूप आरक्षणाची अधिसूचना आज जाहीर करण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह अधिकारी- कर्मचारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारूप आरक्षण अधिसूचनेस हरकती असल्यास 17 ऑक्टोबरपूर्वी तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
सोडतीनुसार, अनसूचित जातीसाठी एकूण १२ जागा (महिलांसाठी ६), अनुसूचित जमाती एकूण ५ जागा (महिलांसाठी ३), नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग १४ जागा (७ महिला), सर्वसाधारण २१ जागा (महिला १०) अशा प्रकारे एकूण ५२ (महिला २६) आरक्षण निश्चित करण्यात आले.
तेल्हारा
दानापूर- सर्वसाधारण महिला, अडगाव बु.- अनुसूचित जमाती, शिरसोली- सर्वसाधारण, बेलखेड- सर्वसाधारण महिला, पाथर्डी- सर्वसाधारण, दहिगाव- सर्वसाधारण, भांबेरी- सर्वसाधारण.
अकोट
उमरा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, अकोलखेड- अनुसूचित जमाती महिला, अकोली जहांगीर- अनुसूचित जमाती महिला, वडाळी देशमुख- सर्वसाधारण महिला, मुंडगाव- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, वरूर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, कुटासा- सर्वसाधारण, चोहोट्टा- सर्वसाधारण महिला.
मूर्तिजापूर
लाखपुरी- अनुसूचित जाती, शेलू (बाजार)- अनुसूचित जाती, कुरूम- सर्वसाधारण, माना- सर्वसाधारण महिला, सिरसो- अनुसूचित जाती, हातगाव- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला, कानडी- अनुसूचित जाती महिला
अकोला
आगर- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग, दहिहंडा- अनुसूचित जाती महिला, घुसर- अनुसूचित जमाती महिला, उगवा- अनुसूचित जाती, बाभुळगाव- अनुसूचित जाती, कुरणखेड- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग, कानशिवणी- अनुसूचित जाती महिला, बोरगाव मंजू- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला, चांदूर- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग, चिखलगाव- सर्वसाधारण महिला.
अंदुरा- अनुसूचित जाती महिला, हातरूण- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग, निमकर्दा- अनुसूचित जाती महिला, व्याळा- सर्वसाधारण, पारस1- सर्वसाधारण, देगाव- अनुसूचित जाती, वाडेगाव- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग
बार्शिटाकळी
कान्हेरी सरप- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला, दगडपारवा- सर्वसाधारण महिला, पिंजर- सर्वसाधारण महिला, झोडगा- सर्वसाधारण महिला, महान- सर्वसाधारण, राजंदा- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग, जामवसू- सर्वसाधारण.
पातूर
शिर्ला- अनुसूचित जाती महिला, चोंडी- अनुसूचित जमाती, विवरा- सर्वसाधारण, सस्ती- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग, पिंपळखुटा- नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग, आलेगाव- सर्वसाधारण महिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.