akola crime news
akola crime news  saam tv
महाराष्ट्र

Akola : 'पत्नीच्या आजाराला पैसे देतो' म्हणणं व्यक्तीला पडलं महागात; मजुराने केलं भयकंर कृत्य

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime News : सोबत काम करणाऱ्या मजुराच्या पत्नीला तुझ्या वैद्यकीय आजारासाठी मदत म्हणून पैसे देतोय, असं म्हणणाऱ्या व्यक्तीला मदतीसाठी पुढे येणं चांगलंच महागात पडलंय. अकोल्यात (Akola) एका महिलेने पतीच्या आणि मानलेल्या भावाच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. शिवा कुकडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत असून तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं.

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

अकोल्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर रोजी शासकीय रुग्णालयातून फोन आला की एमआयडीसी तीन मधील गट्टू बनविण्याच्या एका कारखान्यात कुटुंबासह राहणारा मजूर शिवा कुकडे याचा अपघात झाल्यामुळं डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. लागलीचं पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत मृतकाची पाहणी केली असता डोक्यावर जड अवजाराने वार केल्याची जखम होती, तर रुग्णालयात दाखल करणारे व्यक्तींची विचारणा केली. मृतक शिवा हे घरात बेडवर जखमी अवस्थेत असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले.

दुसरीकडे त्याचा अपघात झाला असावा कोणताही पुरावा दिसून आला नाही. पोलिसांनी तपासचक्र फिरवीत याच कंपनीत काम करणाऱ्या हर्षा मंगळे आणि तिचा पती प्रवीण मंगळे यांच्यासोबत त्यांचा वाद झाल्याचे समजले असून हा वाद २ आणि ३ सप्टेंबर रोजी झाला होता. या सर्वांची कसून चौकशी केली असता त्यांनी शिवा कुकडे यांची हत्या केल्याचं सांगितले. सध्या तिघांना अटक करण्यात आली असून लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास एमाआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखडे करीत आहेत.

हत्येचं नेमकं कारण काय ?

शिवा कुकडे यांनी सोबत काम करणारा मजुर प्रवीण याच्याला पत्नीला तुझ्या वैद्यकीय आजारासाठी पैसे देतो, असे म्हटले. या छोट्याशा कारणामुळे त्यांच्यात २ सप्टेंबर रोजी चांगलाच वाद झाला. या वादामुळे कंपनीच्या मालकाने मारेकरी पती प्रवीण आणि पत्नीला कामावरून काढून टाकले. तेव्हा दोघांनाही शिवाला जीवेमारण्याची धमकी दिली होती.

मजुराने रचला हत्येचा कट

१४ सप्टेंबरला शिवा याची भेट सकाळी हर्षा मंगळे हिच्याशी शिवणी परिसरात झाली. तेव्हा त्याने तिला शिवीगाळ केली असता तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. दरम्यान, पती-पत्नी शिवणीचा रहिवासी म्हणजेच हर्षाचा मानलेला भाऊ आकाश पोळ याला बोलावले. आणि दुपारी ३ च्यासुमारास तिघेही जण शिवा काम करीत असलेल्या कंपनीत गेले. अन् शिवा ज्या खाटेवर झोपलेला होता. तेव्हा पोळ आणि प्रवीणने जड अवजाराने त्याच्या डोक्यावर छातीवर वार केले. त्यानंतर त्याने तिथून लपून-छपून पळ काढला. मात्र त्यांना कंपनीत काम करणारे मजुराने पाहिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT