Akola News  Saam Tv
महाराष्ट्र

Akola Traffic : दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या वेळापत्रक

Akola News : नवरात्र विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान अकोला शहर व परिसरातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • नवरात्र विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे अकोल्यात वाहतूक बदल.

  • ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक वळविण्यात येणार आहे.

  • बसस्थानक, अकोट रोड, बाळापूर, खामगाव या मार्गांवर प्रभाव.

  • जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा आदेश सर्व वाहनांना लागू आहे.

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

नवदुर्गा मूर्ती विसर्जन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला शहरात मिरवणूक, सभा आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्क्रमांच्या पार्श्वभूमीवर दि. ३ ऑक्टोबरला सकाळी ६ वा. पासून ते दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वा. पर्यंत अकोला शहर व अकोला – अकोट राज्य मार्ग व पारस फाटा- बाळापूर या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी जारी केला.

या कालावधीत डाबकी रस्त्याकडून बसस्थानकाकडे जाणारी व मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग : भांडपुरा चौक, पोळा चौक, हरिहर पेठ, वाशीम बायपास, लक्झरी स्टँड, निमवाडीसमोरील उड्डाण पूल, हुतात्मा चौक, सिव्हिल लाईन चौक, टपाल कार्यालय मार्गे बसस्थानक अशी वळविण्यात येईल.

अकोला बसस्थानकाकडून हरिहरपेठेकडे जाणारी वाहतूक : टपाल कार्यालय चौकाकडून सिव्हिल लाईन, नेहरू उद्यान, हुतात्मा चौक, उड्डाण पूल, निमवाडी पोलीस वसाहतीसमोरून वाशिम बायपास, हरिहर पेठेतून जुन्या शहराकडे वळविण्यात येईल.

रेल्वे उड्डाण पुलाकडून कोतवाली, लक्झरी बसस्टँडकडे जाणारी वाहतूक अग्रसेन चौक, उड्डाण पुलावरून कारागृह चौक मार्गे जाईल. लक्झरी बसस्थानकाकडून अकोट स्टँडकडे जाणारी वाहतूक कारागृह चौकातून अग्रसेन चौक मार्गे जाईल.

  • अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग : अकोला बसस्थानक, टपाल कार्यालय चौक, सिव्हिल लाईन चौक, नेहरू उद्यान, उड्डाण पुलावरून वाशिम बायपासकडे, शेगाव टी पॉईंट, गायगाव, देवरी अकोट अशी जाईल.

  • अकोला बसस्थानक ते म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग : टॉवर चौक, न्यायालय मुख्य प्रवेशद्वारापुढून टिळक उद्यान, सातव चौक, बिर्ला राम मंदिर रेल्वे गेट, नवे तापडियानगर, खरप टी पॉईंट, म्हैसांग मार्गे जाईल व येईल.

  • अकोला ते बाळापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग : अकोला- पारस फाटा हायवे ट्रॅप कार्यालयाकडून बाळापूरकडे जाईल व येईल. खामगाव ते पारस फाटा,

  • पातूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग : पारस फाटा, वाशिम बायपास चौक मार्गे वळविण्यात येईल.

  • अकोल्याहून खामगावकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गे : अकोला-पारस फाट्याजवळील रोशन धाबा येथून तपे हनुमान मंदिराजवळील डिव्हायडर बॅरेकेटींग पॉईंटपर्यंत वळविण्यात येईल. हे आदेश सर्व वाहनांना लागू राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT