Crime News : सतत फोनवर बोलायची, प्रेमसंबंधांचा संशय; जन्मदात्याकडून मुलीची हत्या, भावाचाही हात असल्याचे उघड

Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात प्रेमसंबंध आणि मोबाईलवर बोलण्याच्या संशयावरून वडिलांनी स्वतःच्या १७ वर्षीय मुलीला गोळ्या घालून जीवे मारले. या घटनेत पीडितेच्या भावाचाही सहभाग असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
Crime News : सतत फोनवर बोलायची, प्रेमसंबंधांचा संशय; जन्मदात्याकडून मुलीची हत्या, भावाचाही हात असल्याचे उघड
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On
Summary
  • उत्तर प्रदेशच्या शामली जन्मदात्याने पोटच्या मुलीचा घेतला जीव

  • १७ वर्षीय मुलीवर प्रेमसंबंधांच्या संशयावरून वडिलांनी गोळ्या घालून केली हत्या

  • वडिलांसोबत भावाचाही सहभाग असल्याचे उघड

  • पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात धक्कदायक घटना घडली आहे. प्रेमसंबंध आणि मोबाईलवर बोलण्याच्या संशयावरून जन्मदात्याने स्वतःच्या १७ वर्षीय मुलीला गोळी घालून ठार मारल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेत मुलीच्या सख्ख्या भावाचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कांधला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबेठा गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी अचानक गोळीबाराचा आवाज ऐकला. या आवाजाने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही क्षणातच गावकऱ्यांमध्ये बातमी पसरली की, एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे.

Crime News : सतत फोनवर बोलायची, प्रेमसंबंधांचा संशय; जन्मदात्याकडून मुलीची हत्या, भावाचाही हात असल्याचे उघड
Shocking : संतापजनक! विद्यार्थ्याला शाळेच्या खिडकीला उलटं लटकवलं अन्..., धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

१७ वर्षीय सना प्रेमसंबंधात होती. ती सतत फोनवर बोल्ट असल्याने कुटुंबीयांना तिच्या मोबाईलवर तासनतास बोलण्याचा संशय आला होता. या कारणावरून घरात अनेकदा वाद झाले होते. अखेर शनिवारी वडिलांनी आणि भावाने खोटं सांगून सनाला घराच्या छतावर नेले. छतावर नेताच तिच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने सनाचा जागीच मृत्यू झाला.

Crime News : सतत फोनवर बोलायची, प्रेमसंबंधांचा संशय; जन्मदात्याकडून मुलीची हत्या, भावाचाही हात असल्याचे उघड
Heartbreaking : पावसात पोहायला गेले अन् आक्रीत घडलं, ४ जण नदीत बुडाले, बुलढाण्यावर शोककळा

घडलेल्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक स्वतः घटनास्थळी पोचले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे. सनाचा मृतदेह पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

Crime News : सतत फोनवर बोलायची, प्रेमसंबंधांचा संशय; जन्मदात्याकडून मुलीची हत्या, भावाचाही हात असल्याचे उघड
Kalyan News : कल्याणहून पुणे, नगरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अपटेड; शहाड उड्डाण पूल इतके दिवस राहणार बंद, कारण काय?

एसपी नरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, “ही प्रकरण अत्यंत क्रूर आणि अमानवी आहे. वडिलांनी आणि मुलाने मिळून केवळ संशयावरून आपल्या मुलीचा जीव घेतला. पीडितेचा एकमेव गुन्हा म्हणजे तिचे एकावर प्रेम जडले होते. पोलिसांनी या प्रकरणात खून आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सना ही अभ्यासू आणि शांत स्वभावाची होती. मात्र कौटुंबिक मानहानीच्या भीतीने तिच्या वडिलांनी टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने पुन्हा एकदा 'ऑनर किलिंग'चा काळा चेहरा समोर आला असून समाजात संतापाची लाट पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com