tukaram Mundhe  Saam tv
महाराष्ट्र

Akola : तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धसका; भीतीनं शहरात विक्रीच बंद

tukaram mundhe News : तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धसका दुकानदारांनी घेतला आहे. अकोल्यात कारवाईच्या भीतीनं विक्रीच बंद करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

अकोल्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका

तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या नावाखाली अज्ञातांकडून होऊ शकते मोठी फसवणूक,

अकोल्याच्या अन्न व औषध विभागाने शंका उपस्थित करीत व्यापाऱ्यांना केलं मोठ आवाहन

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीनं शटर डाऊन तर काही भागात विक्रीच बंद पाहायला मिळाली. अकोल्यात आज दुपारपासून तुकाराम मुंढेंचा धसका दिसू लागला होता. अकोल्यातील चौहट्टा बाजार, निंबा फाटा, गांधीग्राम, अकोला शहरातल्या विविध भागात तुकाराम मुंढे यांच्या पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकल्या, अशी चर्चा दुपारपासून सुरू होती.

अकोल्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठं आवाहन करण्यात आलं की, तुकाराम मुंढे यांच्या पथकातील आहोत, असं कोणी सांगत असल्यास त्यांची ओळखपत्र मागावं, जवळील व्यापारी वर्ग आणि संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन एकंदरीत या ठिकाणी करण्यात आले.

कारण, तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या नावाखाली अज्ञातांकडून व्यापाऱ्यांची मोठी फसवणूक होऊ शकते, अशी शंका अकोल्याच्या अकोल्याच्या अन्न व औषध विभागाने केलीय. दरम्यान, अकोल्यात आज काही स्वीट मार्ट आणि त्यासोबतच नाश्ता सेंटर या ठिकाणी अन्न व औषध विभागाकडून तपासण्या करण्यात आल्या.

पालघरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने गुटखा माफियांविरोधात ठोकले दंड

तुकाराम मुंढे यांनी गुटखा विक्री आणि वाहतुकी विरोधात कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता पालघर पोलिसांनी देखील गुटखा माफियांविरोधात दंड थोपटले आहेत. गुजरातहून मुंबईकडे विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणारा तब्बल 51 लाखांचा गुटखा पालघरच्या कासा पोलिसांनी जप्त केला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून हा गुटखा मुंबईकडे वाहतूक केली जात असताना कासा आणि उधवादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा सुगंधी पान मसाला जप्त केला असून एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT