Akola Crime Saam Tv
महाराष्ट्र

Akola Crime : अकोला हादरला! भविष्यात संपत्तीत हिस्सा मागणार या भीतीने सावत्र बापानं 9 वर्षीय मुलाला संपवलं

Akola News : एका व्यक्तीने त्याच्या नऊ वर्षीय सावत्र मुलाची निर्घण हत्या केल्याची घटना अकोल्यात घडली आहे. भविष्यात संपत्तीत हिस्सा मागेल या भीतीने आरोपीने मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आले.

Yash Shirke

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घृणपणे खून करून मृतदेह अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून देण्यात आलाय.. सावत्र वडिलांनी मित्राच्या मदतीने या नऊ वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या केलीय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीये.

दरम्यान, भविष्यात संपत्तीत हिस्सा मागणार, या संशयातून सावत्र बापाने त्याच्या मित्राच्या मदतीने हत्याकांड घडवून आणलं. दर्शन वैभव पळसकर असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर आकाश साहेबराव कान्हेरकर (राहणार हिरापूर ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती) असं मारेकरी सावत्र बापाचं नाव आहे. याशिवाय गौरव वसंतराव गायगोले (रा. हिरापूर ता. अंजनगाव जिल्हा अमरावती.) असं मारेकऱ्याला मदत करणाऱ्या साथीदाराचे नाव आहे. अकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

तारीख काल 2 जुलै रोजी सकाळी साडे 8 वाजताच्या सुमारास कुणालाही न सांगता दर्शन घराबाहेर निघून गेला असल्याची आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. मुलाच्या बेपत्ता प्रकरणी आईने तक्रार दिली होती. बेपत्ताप्रकरणी तपास सुरू असतानाच सावत्र वडिलांवर पोलिसांना संशय झाला.. कारण, अकोट शहरातल्या चौकातील नुकतेच लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात वडिलांसोबत मुलगा जात असताना दिसून आलं होतं.. त्यामुळे पोलिसांनी सावत्र वडिलांची कसून चौकशी केली असता त्याने सावत्र मुलाला कायमचं संपवलं असल्याचं बाब समोर आली..

गळा आवळून दर्शनची हत्या..

सावत्र वडील आकाश आणि त्याचा मित्र गौरव या दोघा जणांनी दर्शनला दुचाकीवर नेत त्याचा खून केला आहे.. त्यानंतर दर्शनचा मृतदेह अमरावती अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल परिसरात टाकून दिला. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना समजतात पोलिसांनी काल रात्रीपासून जवळपास 12 तास जंगल परिसरात शोध मोहीम राबवित मुलाचा मृतदेह शोधून काढला आहे. या शोध मोहीममध्ये 7 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, सद्यस्थितीत मृतदेह शव विच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी दिली.

300 रुपयांसाठी हत्याकांडात झाला सहभागी..

मिळालेल्या माहितीनुसार गौरव गायगोले याने 300 रुपयांसाठी त्याचा मित्र अर्थातच मारेकरी सावत्र बापाला हत्याकांडात मदत केली. दोघांनी मिळून दर्शनचा खून केला आहे. दरम्यान मृतक दर्शनाच्या वर लैंगिक छळ झाल्याच प्राथमिक रित्या समजत आहे.. मात्र शव विच्छेदनाच्या अहवालानंतरच सर्व बाबी समोर येतील, असेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत बसला होता, टोळक्याकडून अमानुष मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलक पुन्हा आक्रमक

MPSC Recruitment : 'एमपीएससी'कडून PSIच्या पदांसाठी मेगाभरती जाहीर; अर्जप्रक्रिया कधी सुरु होणार? वाचा सविस्तर माहिती

Side Effects Of Onion: रात्री कांदा का खाऊ नये? कारण जाणून घ्या

Accident: क्षणात भयंकर घडलं! दादरमध्ये सलमान खानच्या अंगावर झाड पडलं

SCROLL FOR NEXT