Ind Vs Eng : कॅप्टन गिलचं खणखणीत शतकं अन् भारताचा डाव ३०० पार, सामन्याच्या पहिल्या दिवशी काय-काय घडलं?

Ind Vs Eng 2nd Test : बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर काल भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवसात काय-काय घडलं? पाहूयात संपूर्ण माहिती...
Ind Vs Eng 2nd Test
Ind Vs Eng 2nd Testx
Published On

India Vs England कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला काल (२ जुलै) बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळला गेला होता. या सामन्यामध्ये इंग्लंडने भारतावर ५ विकेट्सनी विजय मिळवला. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्यासाठी भारतीय संघाने तयारी केली.

एजबॅस्टनच्या मैदानावर काल सामन्याला सुरुवात झाली. सामन्यापूर्वी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू वेन लार्किन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. २८ जून रोजी त्यांचे निधन झाले होते. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे सांगितले. त्याने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामीची जोडी मैदानात उतरली.

Ind Vs Eng 2nd Test
Ind Vs Eng : प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, भारत-इंग्लंड सामन्यादरम्यान खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लंडने केएल राहुलच्या रुपात धक्का दिला. राहुल फक्त २ धावांवर बाद झाला. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर अनलकी ठरत राहुल माघारी परतला. त्याच्यापाठोपाठ आलेल्या करुण नायरने ३१ धावा केल्या. चुकीचा शॉट खेळून करुण नायरची विकेट पडली. त्यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी खेळ सावरला.

Ind Vs Eng 2nd Test
Ind Vs Eng सामन्यात जोरदार राडा, यशस्वी जैस्वाल थेट कॅप्टनलाच भिडला; पाहा Viral Video

यशस्वी जैस्वालचे शतक अवघ्या १३ धावांनी हुकले. एकूणच पहिल्या दिवसात त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. ८७ धावा करुन तो तंबूत परतला. यशस्वी जैस्वालनंतर रिषभ पंतकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण रिषभ पंत इंग्लंडच्या जाळ्यात अडकला. २५ धावांवर तो कॅचआउट झाला. पहिल्या सामन्यात पंतसाठी जी रणनीती इंग्लंडने वापरली होती, त्याच रणनीतीने दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला रिषभ पंतची विकेट मिळाली.

Ind Vs Eng 2nd Test
Yashasvi Jaiswal : इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यात जैस्वाल अ'यशस्वी'! थोडक्यात शतक हुकलं, टुकार चेंडूवर फेकली विकेट

भारताने शेवटच्या फळीसाठी खास नितीश कुमार रेड्डीला संघात सामील केले होते. पण त्याने निराशा केली. तो १ धाव करुन बाद झाला. त्यानंतर अनुभवी रवींद्र जडेजा आणि कॅप्टन शुभमन गिल यांनी भारताचा डाव पुढे नेला. संयमी पद्धतीने खेळत तिसऱ्या सत्रापर्यत दोघांनी भारताची धावसंख्या ३०० पार नेली. शेवटच्या सत्रामध्ये शुभमन गिलने नाबाद शतकीय कामगिरी केली. जडेजा देखील अर्धशतकाच्या जवळ आहे. दुसऱ्या दिवशी दोघे टिकून खेळत भारताची धावसंख्या पुढे नेतील असा विश्वास चाहत्यांना आहे.

Ind Vs Eng 2nd Test
Rishabh Pant : तोच बॉलर, तोच फिल्डर अन् तीच चूक! रिषभ पंत पुन्हा इंग्लंडच्या जाळ्यात अडकला; रागात हॅल्मेट खाली फेकणार इतक्यात...

इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, शोएब बशीर आणि ब्रेडन कार्स यांनी प्रत्येकी १-१-१ गडी बाद केले आहेत. ख्रिस वोक्सने पहिल्या दिवसामध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी केली आहे. जोश टंगला अद्याप एकही विकेट मिळालेली नाही.

Ind Vs Eng 2nd Test
Mohammed Shami : ४ लाखांमध्ये काय होतं? पत्नी हसीन जहाँनं वाढवलं मोहम्मद शमीचं टेन्शन; न्यायालयाच्या निर्णयावर म्हणाली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com