Dharashiv : ऑनलाइन गेमिंगमुळे मॅनेजर कंगाल झाला, बँकेतून २५ लाख ढापले अन् ...

Dharashiv News : एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना धाराशिवमध्ये घडली. बँक मॅनेजरने स्वत:च्या बँकेमध्ये चोरीचा बनाव रचला. पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी स्वतःवर चाकू हल्ला केला. पण तपासादरम्यान त्याचे बिंग फुटले.
Dharashiv Bank News
Dharashiv Bank Newsx
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नळदुर्ग येथील लोकमंगल कॉपरेटिव्ह बँकेमध्ये २५ लाख रुपयांची चोरी झाली. चोरांनी बँकेच्या मॅनेजरवर चाकूने हल्ला केल्याचे म्हटले जात होते. पण आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. बँकेच्या मॅनेजरनेच चोरीचा बनाव करुन बँकेमधील पैसे लंपास केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेतील बँकमॅनेजर कैलास मारुती घाटे हा ऑनलाइन गेमिंगमध्ये कंगाल झाला होता. पैसे मिळवण्यासाठी त्याने चोरीचा प्लान आखला. जिथे काम करतो, त्याच बँकेचे पैसे चोरट्यांनी हल्ला करुन लंपास केल्याची कहाणी त्याने रचली. गोष्ट खरी वाटावी यासाठी त्याने स्वत:वर चाकू हल्ला करुन घेतला.

Dharashiv Bank News
Amarnath Yatra : बम बम भोले! अमरनाथ यात्रेला आजपासून सुरूवात, भाविकांमध्ये प्रचंड उत्साह

लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये २५ लाख रुपयांची चोरी झाली. बँकेच्या मॅनेजरवर चाकूहल्ला झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांच्या तपासात बँकेमॅनेजर कैलास मारुती घाटेचे बिंग फुटले. चोरी झालीच नाही हे समोर आले. हा सारा प्रकार एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे.

Dharashiv Bank News
Nashik Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, २ दिग्गज नेत्यांसह १० जण भाजपच्या गळाला

बँक मॅनेजर कैलास घाटेला ऑनलाइन गेमिंगचे वेड होते. यात तो कंगाल झाला. पैसे मिळवण्यासाठी त्याने बँकेत चोरी झाल्याचे नाटक केले. पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी स्वत:वर चाकूने हल्ला देखील केला. पोलिसांच्या तपासात त्याची ही गोष्ट खोटी ठरली. घाटेने २५ लाख लंपास करण्यासाठी हा प्लान केल्याचे समोर आळे. पोलिसांनी कैलास घाटेकडून २५ लाख रुपये वसूल केले आहे.

Dharashiv Bank News
दहशतवाद्यांनी 'माली'त ३ भारतीयांचं दिवसाढवळ्या केलं अपहरण, रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com