Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Akola Accident : अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच, 2 दिवसात तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

Akola News : अकोला जिल्ह्यातील पातुर महामार्गावर चिखलगाव उड्डाणपुलाजवळ कंटेनर पलटी होऊन चालकचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पोलिसांनी मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Alisha Khedekar

  • अकोला पातुर महामार्गावर चिखलगाव पुलाजवळ कंटेनर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

  • अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प, वाहनांची मोठी कोंडी

  • पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या सहाय्याने मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले

  • स्थानिकांनी महामार्ग सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजनांची मागणी केली

अकोला जिल्ह्यातील पातुर महामार्गावर शनिवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. हैदराबाद महामार्गावरून जात असलेला एक कंटेनर चिखलगावजवळील उड्डाणपुलावर अचानक पलटी झाला. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात कंटेनर चालक साजिद खान सरून खान याचा जागीच मृत्यू झाला. असून तीन गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका गंभीर होता की कंटेनर वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. विशेषतः सकाळच्या वेळेत महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आणि काही अंतरावर वाहने रांगेत उभी राहिली. घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अपघाती कंटेनरला क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला नेण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मार्ग मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या अपघातामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलावर वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अशा प्रकारचा अपघात होणे धोकादायक ठरू शकतो. अपघाताची नोंद घेत पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अपघातग्रस्त चालकाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आला असून त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. अचानक घडलेल्या या अपघातामुळे अकोला पातुर महामार्गावर तणावाचे वातावरण आहे.

2 दिवसांपूर्वी याच महामार्गावर गणेश भक्तांचा अपघात

२ दिवसांपूर्वी अर्थातच ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन करून परत येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात झाला होता. अकोल्यातल्या पातूर-अकोला रस्त्यावरील लाखनवाडा येथे अपघातात २ तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर २ जण जखमी आहे. मृत आणि जखमी अकोल्यातील शिवसेना वसाहत भागातील रहिवासी आहे. जय बजरंग गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाच कापशी तलावावरून गणेश विसर्जन करून परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला होता. मृत आणि जखमी असे चौघे जण एकाच दुचाकीवर जात असताना त्यांच्या दुचाकीला कारने जबर धडक दिलीय. यात रामचरण अंधारे याचा जागीच मृत्यू तर विकी माळी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर राहुल खोंड, विनोद डांगे हे जखमी असून त्यांची दोघांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT