Truck Driver Strike Saam tv
महाराष्ट्र

Truck Driver Strike : अकोल्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा; ट्रक चालकांच्या संपाचा फटका

Akola News : हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. आठवडाभरानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Rajesh Sonwane


हर्षदा सोनोने 

अकोला : हिट अँड रनच्या कायद्या विरोधात सुरू असलेल्या ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. आंदोलन सुरु असल्याने रस्त्यावरून जात असलेल्या ट्रकला (Gas) देखील अडविले जात आहे. याचा फटका (Akola) अकोल्यात गॅस पुरवठ्यावर झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Live Marathi News)

हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. आठवडाभरानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे याचा परिणाम जनसामान्यांवर जाणवू लागला आहे. संप अधिक दिवस सुरू असल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रक चालकांच्या संपाचा फटका अकोल्यातील घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर (Gas Cylinder) धारकांना बसला आहे. शहरात कालपासून गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही गॅस कंपनीचा गॅस साठा संपला असल्याने हा तुटवडा जाणवत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस

Elvish Yadav: 'मी आणि माझे कुटुंब...'; गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Police Attacked : मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, नेमकं काय घडलं? VIDEO

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT