धुळे : आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल म्हणजे भविष्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री (Ajit Pawar) पदाच्या स्वप्नावर ठोकलेला अंतिम खिळा आहे; असा खोचक टोला (Dhule) धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून लगावला आहे. (Breaking Marathi News)
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल कितीही विवादास्पद असला तरी सुध्दा महाराष्ट्राच्या राजकारणांवर दिर्घकाळ परिणाम करणारा तसेच मराठा समाजाचे खच्चीकरण करणारा ठरेल. भाजप संदर्भात बोलताना 'धरल तर चावत आणि सोडल तर पळत.' अशी अवस्था भाजप प्रवेशीत (Eknath Shinde) एकनाथ शिंदे व अजित पवार यांची झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे पद जाईल व नंतरचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार होतील, यासाठी पाण्यात देव बुडवून बसलेल्यांच्या देवांच्या नाका-तोंडात पाणी गेले आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भाजपमध्ये कसे नेते हे अजितदादांना कळेल
अजित दादांना आता कळेल की, भारतीय जनता पक्षात किती कपटी, कारस्थानी व केसाने गळा कापणारे हृदय शून्य नेते बसले आहेत; अशी भावना देखील गोटे यांनी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर सहा महिन्यांपूर्वी मी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरण्याचा आनंद असल्याची देखील भावना गोटे यांनी व्यक्त केली आहे,
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.