Hingoli News: हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देऊन आकांक्षीत जिल्हा ओळख पुसणार: अजित पवार

Ajit Pawar News: हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देवून आकांक्षीत जिल्हा ही ओळख पुसणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar
Ajit Pawarsaam tv
Published On

Hingoli News:

हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देवून आकांक्षीत जिल्हा ही ओळख पुसणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनातून दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

Ajit Pawar
Navneet Rana: 'ही मॅच फिक्स होती', ठाकरेंच्या वक्तव्यानंतर नवनीत राणा यांनी सरळ त्या प्रसंगाची करून दिली आठवण

जिल्हा वार्षिक योजना 2024-25 या अर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष 167 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 171 कोटी 49 लाख 5 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. त्यापैकी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत 171 कोटी 49 लाख 05 हजार रुपयाचा अतिरिक्त निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा 338 कोटी 49 लाख 05 हजार रुपये करण्याची मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्याची सकारात्मक जीडीपी वाढ ही आनंदाची बाब असून खात्यावर असलेला उपलब्ध निधी त्वरित खर्च करावा तसेच निवडणूक आचारसंहिता ग्रहित धरून खर्चाला प्राधान्य देवून सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून सरकारचा पैसा योग्य ठिकाणी, दर्जेदार कामे होण्यासाठी खर्च करावा. तसेच प्रधानमंत्री महत्वाकांक्षी योजना व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त निधी खर्च करण्याला प्राधान्य द्यावे. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Thackeray Vs Shinde : निकालानंतर ठाकरे-शिंदेंचे कार्यकर्ते भिडले, VIDEO आला समोर

केंद्र शासनाचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. हिंगोलीचा आकांक्षीत जिल्हा म्हणून असलेली औळख पुसण्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा चालू वर्षाचा शंभर टक्के निधी खर्च करावा. श्री संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रासाठी निविदा प्रक्रिया व तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, निती आयोगाने अकांक्षित जिल्हे व तालुके या सर्व बाबींचा विचार करुन जास्तीत जास्त निधी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com