Thackeray Vs Shinde : निकालानंतर ठाकरे-शिंदेंचे कार्यकर्ते भिडले, VIDEO आला समोर

Maharashtra MLA Disqualification Result: छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये आज शिंदे गट शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
Thackeray Group Vs Shinde Group
Thackeray Group Vs Shinde GroupSaam Tv
Published On

Chhatrapati Sambhajinagar News:

छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये आज शिंदे गट शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना अडवून ठेवले होते. त्यामुळे बराच काळ दोन्हीकडूनही जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

संध्याकाळी साडेसात वाजता शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ आणि आमदार प्रदीप जयस्वाल हे आपल्या कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा करण्यासाठी क्रांती चौकात दाखल झाले होते. फटाक्यांची आदिशबाजी करत जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच ठाकरे टाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत क्रांती चौकाकडे आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Thackeray Group Vs Shinde Group
Uddhav Thackeray: सुप्रीम कोर्टात निर्णय टिकणार नाही, निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

जवळपास तासभर दोन्ही गटाच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्हीकडचे कार्यकर्ते निघून गेले. मात्र तासभर शहरातील क्रांती चौकामध्ये तणाव दिसून आला. सोबतच वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. (Latest Marathi News)

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर, शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे. तरी ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे नाराजी व्यक्त करत आंदोलन करून निषेध नोंदवत आहेत.

सांगलीत शिंदे गटाचा जल्लोष

शिवसेना शिंदे गटाची या निकालानंतर सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदार संघात जल्लोष करण्यात आला. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या उपस्थितीत करगणी येथे फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. तसेच आमदार अनिल बाबर यांना फेटा नेसवत आणि पेढे वाटप करत जल्लोष केला. एकनाथ शिंदे आगे बढो, अनिल भाऊ आगे बढोच्या घोषणाबाजी करण्यात आली.

Thackeray Group Vs Shinde Group
Maharashtra MLA Disqualification Result: मोठी बातमी! शिवसेना शिंदेंची, १६ आमदार पात्र; ठाकरेंना धक्का, विधानसभा अध्यक्षांचा निर्वाळा

निर्णयानंतर धुळ्यात ठाकरे गट शिवसैनिकांनी नार्वेकरांच्या प्रतिमेस जोडे मारून केले निषेध आंदोलन

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी आज शिंदे गट शिवसेनेच्या पात्र-अपात्र निर्णयावर आपला निकाल हा शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या पारड्यात दिल्यानंतर, हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे म्हणत ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com