Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert : अकोला जिल्ह्याला पाच दिवस पावसाचा इशारा; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

Akola News : काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पाऊस कमी झाला असता तरी पुन्हा एकदा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नागपूरच्या वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तविला आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : सातत्याने पाऊस पडत असून अकोला जिल्ह्याला देखील पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यानंतर अकोला जिल्ह्यात पुढील पाच दिवस पून्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. अकोला शहरासह ग्रामीण भागात अर्थात जिल्ह्याभरात आजपासून २८ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यात जोरदार पावसाचा तडाखा बसत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय अनेक भागात पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. अकोला जिल्ह्याला देखील मागील आठवड्यात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. काही दिवसांपासून पाऊस कमी झाला असता तरी पुन्हा एकदा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

प्रशासनाचे आवाहन 

मागील पावसामुळे नदी, नाले व तलाव यामध्ये जलसाठा जमा झाला आहे. यामुळे आगामी दिवसात जोरदार पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अनावश्यकपणे पाण्यात जाण्याचे धाडस करू नये. तसेच नदी, अज्ञात किंवा खोल पाण्यात जाऊ नका. विजेच्या तारा आणि गटारींपासून दूर राहा. पूरग्रस्त भागातून वाहन नेऊ नका. कारण पुराच्या पाण्यामुळे रस्त्यांचा अंदाज येत नाही. नदीकाठाजवळील गावातील ग्रामस्थांना सतर्कतेची सुचना देण्यात आले आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस पाऊस 

जळगाव जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. तीन तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून येथील जनजीवन पूर्वपदावर येत असून जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT