जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यात पावसाने झोडपून काढले आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले असून यामध्ये हजारो हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. हे नुकसान पाहून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबलेले नाहीत.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यांत दोन दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाचोरा तालुक्यात ४३१, तर भडगाव तालुक्यात ३४१ घरांचे नुकसान झाल्याची नोंद झाली. तर भडगाव तालुक्यातील २२ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो.
डोळ्यातील अश्रू थांबेना
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आजही थांबू शकले नाहीत, इतकी विदारक परिस्थिती शेतीबाबत झाल्याचे नुकसानीवरून दिसून येत आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हजारो हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. आतापर्यंत पिंपळगाव बुद्रुक (ता. भडगाव) येथील शेतकरी अमोल ईश्वर पाटील यांच्या पाच शेळ्या नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने दगावल्या आहेत.
संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान घरांची पडझड
जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने हिवरा नदीला पूर येऊन अनेक घरात पाणी शिरले आहे. यामुळे घरातील सामानासह घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. यात बाहेरपुरा, कृष्णापुरी, कोंडवाडा जनता वसाहत या भागात मोठे पाणी साचले होते. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.