Parbhani Heavy Rain : परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; शेताला आले नदीचे स्वरूप, होत्याचं नव्हतं झाले

Parbhani News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होऊन होत्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाहण्यास मिळत आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे
Parbhani Heavy Rain
Parbhani Heavy RainSaam tv
Published On

विशाल शिंदे
परभणी
: परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाने हाहाकार माजवला असून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने शेताला देखील नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होऊन होत्याचे नव्हते झाले आहे.

राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्यांना मोठे पूर आल्याने पुराचे पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुसळधार पावसाचा अधिक फटका शेती पिकांना बसत आहे. हीच परिस्थिती परभणी जिल्ह्यात पाहण्यास मिळत असून मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. 

Parbhani Heavy Rain
Hingoli Crime : हिंगोलीमधील भांडेगाव गोळीबाराने हादरले; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे होत्याचं नव्हतं झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ज्या पिकावर शेतकऱ्यांचे पुढचे नियोजन असते, तेच पीक हातातून गेले आहे. ज्या पिकामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी- दसरा लेकरा बाळांचे शिक्षण होते. तेच पीक हातातून गेले आहे. यामुळे ऐन दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे दिवाळे निघाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Parbhani Heavy Rain
Leopard Attack : भरवस्तीत बिबट्याचा हल्ला; वडिलांसोबत खेळत असलेल्या चिमुकल्याला नेले उचलून

शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा 

पिक घेण्यासाठी शेतकऱ्याने व्याजाने पैसे घेतले होते. मात्र पिकांचे नुकसान झाल्याने व्याजाचे पैसे कसे फेडायचे; असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आता फक्त शासनाच्या मदतीकडे लागले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com